प्रातिनिधिक छायाचित्र File Photo.
राष्ट्रीय

Hyderabad doctor death |अरेरे.! मांजराच्या हट्टापायी संपवले जीवन; घरातून विरोध झाल्याने डॉक्टर तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

Hyderabad doctor death | ॲलर्जीच्या त्रासातून कुटुंबीयांनी केला होता प्राणी पाळण्यास विरोध

पुढारी वृत्तसेवा

Hyderabad doctor death

हैदराबाद : घरामध्ये पाळीव मांजर पाळण्यावरून कुटुंबीयांशी झालेल्या वादानंतर, हैदराबादमधील अलवाल भागात एका २३ वर्षीय डॉक्टर तरुणीने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टी. प्रिन्सी ऊर्फ श्रेष्ठा (रा. रिसाला बाजार) असे मृत तरुणीचे नाव आहे. तिने अलीकडेच एमबीबीएस (MBBS) पदवी पूर्ण केली होती आणि ती पदव्युत्तर शिक्षणाची (PG) तयारी करत होती.

नेमकं काय घडलं?

अलवाल पोलीस उपनिरीक्षक एन. देवेंद्र यांनी सांगितले की, प्रिन्सीने काही दिवसांपूर्वी एक मांजर पाळण्यासाठी आणले होते. मात्र, त्यावरून तिचे तिच्या कुटुंबीयांशी वारंवार वाद होत होते. घरात मांजर असल्यास ॲलर्जीचा त्रास होईल, असे कुटुंबीयांचे मत होते, त्यामुळे त्यांचा या पाळीव प्राण्याला विरोध होता," अशी माहिती पोलिसांनी दिली.

व्यथित होऊन जीवन संपवले

याच वादातून व्यथित होऊन, शुक्रवारी दुपारी जेव्हा कुटुंबीय काही वैयक्तिक कामासाठी बाहेर गेले होते, तेव्हा प्रिन्सीने तिच्या फ्लॅटमधील छताच्या पंख्याला गळफास लावून घेऊन जीवन संपवले. दुपारी जेवणाबाबत पालकांनी प्रिन्सीला फोन केला. मात्र, तिने फोन न उचलल्यामुळे पालकांनी शेजाऱ्यांना घरी जाऊन पाहण्यास सांगितले. शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता, हॉलमधील छताच्या पंख्याला ती लटकलेल्या अवस्थेत आढळली. घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. डॉक्टरांनी तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.

घटनास्थळी सापडली नाही सुसाईड नोट

"कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मांजर पाळण्यास परवानगी न मिळाल्याने प्रिन्सी नाराज होती आणि त्यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. या प्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम १९४ (संशयास्पद मृत्यू) अन्वये गुन्हा दाखल झाला असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT