Hyderabad News AI Photo
राष्ट्रीय

Hyderabad News: पत्नीचे फोटो काढायला गेला अन् क्षणात मृत्यू झाला; केबल ब्रिजवर नेमकं काय घडलं?

केबल ब्रिजवर एक भीषण अपघात झाला. आपल्या पत्नीचा फोटो काढत असताना एका भरधाव मर्सिडीज कारने धडक दिल्याने तरुण व्यावसायिकाचा मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

Hyderabad News

हैदराबाद: शहरातील दुर्गम चेरुवू केबल ब्रिजवर रविवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. आपल्या पत्नीचा फोटो काढत असताना एका भरधाव मर्सिडीज कारने धडक दिल्याने ३२ वर्षीय तरुण व्यावसायिकाचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की धडक दिल्यानंतर कार पुलाच्या रेलिंगला धडकून उलटली. या घटनेनंतर कारचालक वाहन घटनास्थळीच सोडून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

श्याम राज (वय ३२, हफीजपेठ) असे मृत तरूणाचे नाव आहे. श्याम हा त्याच्या पत्नीसह रविवारी पहाटे दुचाकीवरून केबल ब्रिजवर आला होता. एका ट्रॅव्हल बसला पार्सल पोहोचवून जेवण केल्यानंतर ते घरी परतत होते. वाटेत केबल ब्रिजवर त्यांनी दुचाकी उभी केली. श्यामची पत्नी पुलावरील पदपथावर उभी होती, तर श्याम हा रस्त्यावर उभे राहून तिचे फोटो काढत होता.

त्याच वेळी एका भरधाव मर्सिडीज कारने श्याम यांना जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटलेली कार रेलिंगला आदळून पलटी झाली. या अपघातात श्याम यांना गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. कार उलटलेली असल्याने उपस्थितांनी चालकाला बाहेर काढले. मात्र, गोंधळाचा फायदा घेत कारचालक तेथून पळून गेला. जखमी श्याम याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT