Crime News pudhari photo
राष्ट्रीय

Crime News: गर्लफ्रेंडसाठी पत्नीचा खून करून पुरले... ४ दिवसांनी पुन्हा खड्डा काढला अन् पती तिथंच फसला...

प्रियांका उर्फ पूजा ही २६ डिसेंबरपासून बेपत्ता होती. त्यानंतर एक आठवड्यानंतर गावातील लोकांना शंका आली अन्...

Anirudha Sankpal

Husband Kills Wife For Girlfriend Crime News: बिश्रामपूर पोलिस स्टेशनमधील तिसिबार दारूआ गावातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडच्या मदतीनं आपल्या पत्नीचा खून करून तिचा मृतदेह गर्लफ्रेंडच्या गावाजवळ पुरला होता. मृतदेहाची दुर्गंधी वाढू नये म्हणून त्या नराधमानं एका कुत्रा मारून तो देखील मृतदेहासोबत पुरला.

मृत महिलेचे नाव प्रियांका उर्फ पूजा असून तिचं लग्न कौडिया भुखला गावातील रणजीत मेहता याच्यासोबत झाले होते. मात्र प्रियांका उर्फ पूजा ही २६ डिसेंबरपासून बेपत्ता होती. त्यानंतर एक आठवड्यानंतर गावातील लोकांना शंका आली आणि त्यांनी प्रकरण पोलिसांच्या कानावर घातल्यानंतर धक्कादायक गोष्टी उजेडात आल्या.

जेसीबीने खड्डा खणला

पोलिसांना माहिती मिळताच गुरूवारी जेसीबी मशीनने महिलेचा पुरलेला मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. हा मृतदेह टुकबेरा गावातील रिकाम्या जागेत पुरला होता. याच भागात आरोपीची गर्लफ्रेंड रहात होती. बिसरामपूर पोलिसांनी सांगितली की पहिले काही दिवस काहीही कळालं नव्हतं कारण आरोपीनं मृतदेहाची दुर्गंधी येऊ नये म्हणून कुत्र्याला मारून तिथं टाकलं होतं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ज्या दिवशी आरोपीनं पत्नीची हत्या केली त्याच दिवशी तिला पुरण्यात आलं. सुरूवातीला कोणाला संशय आला नाही.

पतीच्या वागण्यावर आली शंका

त्यानंतर प्रियांका बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी तिला सतत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा फोन बंद येत होता. प्रियांकाची काहीच माहिती मिळत नव्हती. त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांना या प्रकरणात पतीच्या वागण्यावर शंका आली.

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, 'आरोपीने ४ दिवसांनी ज्या ठिकाणी पत्नीचा मृतदेह पुरला होता ती जागा खोदली. त्यावेळी त्यानं मेलेल्या कुत्र्याला पुरत असल्याचा दिखावा केला. त्याने खूप चलाखीने खड्डा खोदला आणि कुत्र्याला पत्नीच्या मृतदेहाच्या जवळ फेकून खड्डा पुन्हा मातीने भरला.

संशय आलेल्या पोलिसांनी खड्डा पुन्हा खणला

दुसरीकडं प्रियांकाची काहीच माहिती मिळत नाहीये म्हटल्यावर तिची हत्या झाल्याची चर्चा सुरू झाली. पोलिसांनी देखील घटनास्थळाची तपासणी केली. त्यानंतर मेजिस्ट्रेच्या उपस्थितीत ५ फूट खोल खड्डा काढण्यात आला.

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे प्रियांका आणि रणजीतचे लग्न जवळपास ७ वर्षापूर्वी झालं होतं. पोलिसांना खड्डा खोदल्यानंतर मृतदेह आढळून आला. त्यानंतर कुटुंबियांनी प्रियांकाचा पती त्याची गर्लफ्रेंड आणि तिचे वडील यांच्यासह अन्य लोकांविरूद्ध FIR दाखल दाखल केली.

त्यानंतर पोलिसांनी हत्या, हत्येचा कट आणि पुरावे नष्ट करण्याच्या कलमांखाली तपास सुरू केला. आरोपी पती आणि गर्लफ्रेंड फरार आहेत. पोलीस त्यांना पकडण्यासाठी छापेमारी करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT