पत्‍नीने सुकी भाजी बनवली नाही.. पतीचा ११२ वर फोन, मध्यरात्री पोहोचले पोलीस file photo
राष्ट्रीय

Gravy Vegetable : पत्‍नीने सुकी भाजी बनवली नाही.. पतीचा ११२ वर फोन, मध्यरात्री पोहोचले पोलीस अन्..

उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात भाजीवरून एक अजब प्रकार समोर आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

husband calls police midnight dispute wife regarding gravy vegetable budaun

पुढारी ऑनलाईन : संसारात भांड्याला भांडे लागण्याची म्हण आपण ऐकली असेल पण घरातले किरकोळ वाद जेंव्हा बाहेर येतात तेंव्हा मात्र त्‍या घटनेची चांगलीच चर्चा होते अशीच एक नवरा-बायकोतील वादाची घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात भाजीवरून एक अजब प्रकार समोर आला आहे. पत्नीने रस्सा असलेली भाजी बनवल्याने नाराज झालेल्या पतीने मध्यरात्री पोलिसांना फोन केला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कारण विचारले असता त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत समजूत काढली आणि प्रकरण शांत केले.

उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील वजीरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात रविवारी रात्री भाजी बनवण्याच्या पद्धतीवरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. पत्नीने सुकी भाजी न बनवल्याने नाराज झालेल्या पतीने आपत्कालीन सेवा क्रमांक 112 वर फोन करून घरगुती वादाची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

चौकशीदरम्यान तरुणाने पोलिसांना सांगितले की, त्याची पत्नी दररोज रस्सा असलेली भाजी बनवते, मात्र त्याला सुकी भाजी आवडते. पोलिसांनी दोन्ही पक्ष तसेच कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली आणि प्रकरण शांत केले. पोलिसांनी या प्रकरणावर पडदा टाकला.

पती पोलिसांना म्हणाला- माझ्या पत्नीला समजावून सांगा

पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा पतीने तक्रार करत सांगितले की, त्याची पत्नी नेहमी रस्सा असलेली भाजी बनवते, तर त्याला सुकी भाजी आवडते. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या पत्नीला समजावून सांगावे, अशी विनंती त्याने केली.

यावर पोलिसांनी तरुणाला अशा किरकोळ कारणांसाठी पोलिसांना त्रास देऊ नये, अशी समज दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

पत्नीचा आरोप आणि पोलिसांची कारवाई

दुसरीकडे, पत्नीने आरोप केला आहे की, तिचा पती अनेकदा दारूच्या नशेत तिच्याशी वाद घालतो आणि अश्लील भाषेचा वापर करतो. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात कोणत्याही पक्षाकडून लेखी तक्रार देण्यात आलेली नाही. 112 क्रमांकावरून माहिती मिळाल्याने पोलिसांनी दोन्ही बाजूंची समजूत काढली आणि त्याच वेळी तक्रार बंद केली. या प्रकरणात कोणतीही पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT