पुढारी ऑनलाईन डेस्क : ओडिशातील पुरी या समुद्रकिनारी असलेल्या तीर्थक्षेत्रातील भगवान जगन्नाथाच्या वार्षिक रथयात्रेत रविवारी (दि.7) सुरु झाली. या यात्रेमध्ये लाखो भाविकांनी सहभाग नोंदवला होता. दरम्यान या ठिकाणी झालेल्या गर्दीमुळे अनेक भाविक जखमी झाले आहेत. रथ ओढण्याच्या कार्यक्रमादरम्यान एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना पुरी येथील बडा डांडा येथे घडली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या आपत्कालीन सेवांनी जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
'जय जगन्नाथ', 'हरबोल'चा नारा आणि झांजांच्या आवाजाने बाराव्या शतकातील मंदिर आणि तीन किलोमीटर लांबीचा भव्य रस्ता दुमदुमून गेला होता. मंदिराच्या सेवकांनी - दैतपतींनी आपापले रथ मंदिराच्या गर्भगृहात जोडले आणि देवतांना 'रत्न सिंहासन'मधून बाहेर काढल्यामुळे याला 'बडा डांडा' म्हणून ओळखले जाते. बडा डांडा येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
यावेळी तब्बल 53 वर्षांच्या कालावधीनंतर 7 जुलै रोजी एकाच दिवशी नेत्र उस्ताव, देवतांचे नबजौबन दर्शन आणि रथयात्रा असे विधी पार पडले. रविवारी (दि.7) तिन्ही प्रमुख विधी एकाच दिवशी होत असल्याने रस्त्यावर काही मीटर गेल्यानंतर रथ ओढण्याची प्रक्रिया स्थगित होण्याची शक्यता आहे. जगन्नाथ मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडीचा मंदिरासाठी ही यात्रा सोमवारी सकाळी पुन्हा सुरू होईल.