Raja Raghuvanshi murder case | मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या इंदूरमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणी नवा धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणी मेघालय पोलिसांनी राजा रघुवंशी यांची पत्नी सोनम रघुवंशी व तिचा प्रियकर राज कुशवाह या दोघांना अटक केली आहे. राज कुशवाहावर राजाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. या कटात सोनम रघुवंशी देखील सहभागी होती. राज कुशवाहचे मित्र विशाल, आकाश आणि आनंद या तिघा मित्रांनाही अटक करण्यात आली असून ते राजा रघुवंशी यांची हत्या करण्यासाठी कसे तयार झाले, याबाबतचा धक्कादायक खुलासा पोलीस चौकशी समोर आला आहे.
या प्रकरणी माहिती देताना आलीपूर्व खासी हिल्सचे पोलीस अधीक्षक विवेक सीम यांनी सांगितले की, राजा रघुवंशी प्रकरणी सोनम आणि राज कुशवाह सह अन्य तिघा तरुणांना अटक करण्यात आली आहे. तिन्ही तरुण एकमेकांचे मित्र आहेत. तर एकजण राज कुशवाहचा चुलत भाऊ आहे. सोनम-राज कुशवाह या दोघांनी मारेकर्यांना खूनसाठी पैसे दिले नव्हते. त्यांना प्रवास व राहण्यासाठी ५० हजार रुपये दिले होते. ही हत्या पैसे देवून करण्या आली नव्हती. तर तीन तरुणांनी मित्र राज कुशवाह याला मदत करण्यासाठी राजा रघुंवशी यांची हत्या केल्याचे पाेलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे की, राजा रघुवंशी यांची हत्या करण्याचा कट फेब्रुवारीमध्ये इंदूरमध्ये रचण्यास सुरुवात झाली. ११ मे रोजी सोनमशी लग्न होण्यापूर्वीच हा कट रचण्यात आला होता. राज या कटाचा सूत्रधार आहे, तर सोनमनेही या कटाला पाठिंबा दिला. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी एखाद्या अनोळख्या तरुणीच खून करुन तिच्या मृतदेह जाळून सोनमचा मृत्यू झाल्याचे बतावणी करण्याचाही डाव होता.
लग्नानंतर काही दिवसांनी राजा (२९) आणि सोनम (२४) मेघालयाच्या पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात हनीमूनसाठी गेले. २३ मे रोजी दोघेही सोहरा (चेरापुंजी) येथील पर्यटनस्थळावरून बेपत्ता झाले. २ जून रोजी राजा रघुवंशी यांचा मृतदेह वेइसावॉन्ग धबधब्याजवळील एका खोल दरीत आढळला. या घटनेपासून बेपत्ता असणारी सोनम हिला पोलिसांनी ९ जून रोजी गाजीपूरमध्ये ताब्यात घेतले होते. पोलिस तपासात स्पष्ट झाले की, राजा आणि साेनम आसामला जाण्यापूर्वीच राजचे साथीदार आसाममध्ये पोहोचले होते. सुरुवातीला त्यांनी गुवाहाटीत राजा रघुवशीची हत्या करण्याचा कट रचला होता. मात्र हा डाव फसला. यानंतर सोनम राजाला घेवून शिलाँगला गेली. येथे त्याची हत्या करण्यात आली.