Raja Raghuvanshi Murder Case | हत्‍या प्रकरणातील आरोपीच्‍या कानाखाली 'जाळ'

संतप्‍त प्रवाशाचे इंदूर विमानतळावर कृत्‍य, राजा रघुवेशी हत्‍या प्रकरणातील सर्व आरोपी मेघालय पोलिसांच्‍या ताब्‍यात
Raja Raghuvanshi Murder Case
राजा रघुवेशी हत्‍या प्रकरणातील आराेपीला इंदूर विमानतळावर संतप्‍त प्रवाशाने कानशिलात लगावली.(Image source- X)
Published on
Updated on

Raja Raghuvanshi Murder Case : मेघालयात हनिमूनसाठी गेलेला मध्‍य प्रदेशमधील तरुण राजा रघुंवशी याची हत्‍या झाली. या प्रकरणी त्‍याच्‍या पत्‍नीसह अन्‍य चार आरोपींना अटक करण्‍यात आली आहे. या घटनेतील आरोपींविरोधात मध्‍य प्रदेशमध्‍ये संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद मंगळवारी रात्री इंदूरमधील विमानतळावर उमटले. आरोपीला मेघालयमध्‍ये पोलिस घेवून जात असताना संतप्‍त प्रवाशाने एकाचा कानशिलात लगावत आपल्‍या संतापाला वाट करुन दिली.

आराेपीच्‍या कानशिलात...व्हिडिओ तुफान व्‍हायरल

'आयएएनएस'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, मंगळवारी रात्री इंदूर येथील देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावर राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपीला एका प्रवाशाने कानशिलात लगावली. मेघालय पोलिसांचे पथक चार आरोपींसह विमानतळावर प्रवेश करत असताना हा प्रकार घडला. सामान घेऊन वाट पाहणाऱ्या एका प्रवाशाने आरोपीला पाहिले. त्याने अचानक एका आरोपीला थप्पड मारली. घटनेचा व्हिडिओ तुफान व्‍हायरल झाला आहे. मध्‍य प्रदेशमध्‍ये राजा रघुवंशी यांच्‍या हत्‍या प्रकरणी संतापाची लाट उसळली असून, आरोपींना कठोर शिक्षा होण्‍याची मागणी होत आहे.

हत्‍येनंतर पत्‍नी सोनम इंदूरला येवून गेल्‍याचे स्‍पष्‍ट

इंदोरचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त राजेश दंडोटिया यांनी सांगितले की, "न्यायालयाने ट्रान्झिट कस्टडी मिळवल्यानंतर मेघालय पोलिसांचे १२ सदस्यांचे पथक राज कुशवाह, विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी या चार आरोपींना घेऊन शिलाँगला रवाना झाले. २३ मे रोजी मेघालयात राजा रघुवंशीची हत्या झाली होती. यानंतर सोनम मेघालयातून इंदूरला आली होती. २५ ते २७ मे दरम्यान देवास नाका परिसरातील भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहिली होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे."

मेघालय पोलिसांचा मध्‍य प्रदेशमध्‍ये तपास

दरम्यान, मेघालय पोलिसांच्या पथकाने आरोपी विशाल चौहानच्या घरी भेट दिली. इंदूरचे सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) पूनमचंद्र यादव म्हणाले की, चौहानने दिलेल्या माहितीच्या आधारे, रघुवंशीच्या हत्येच्या वेळी त्याने घातलेली पॅन्ट आणि शर्ट त्याच्या घरातून जप्त करण्यात आले आहेत. हे साहित्‍य फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठवले जाणार आहे.

काय घडलं होतं?

राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम २२ मे रोजी हनिमूनसाठी शिलाँगला गेले होते. २३ मे रोजी संध्याकाळपासून ते चेरापुंजी जवळील ओसारा हिल्स येथून बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांचा कुटुंबाशी संपर्क झाला नाही.राजा रघुवंशी यांचा मृतदेह ११ दिवसांनंतर शिलाँगमधील एका पर्यट‍नस्थळी २०० फूट खोल दरीत झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ड्रोनच्या मदतीने त्यांचा मृतेदह शोधून काढण्यात आला. नवदाम्पत्यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची आणि सोनमचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्‍कराची मदत घ्‍यावी, अशी मागणी केली होती. मागील काही दिवस पोलीस हा सोनम रघुवंशीचा शोध घेत होते. यानंतर रविवार ८ जूनला रात्री उशिरा सोनम वाराणसी-गाझीपूर मुख्य रस्त्यावरील काशी ढाब्यावर सापडल्याने या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले. तिनेच आपल्‍या प्रियकर व त्‍याच्‍या साथीदारांसह पतीची हत्‍या केल्‍याचा आरोप मेघालय पोलिसांनी केला आहे. सध्‍या सर्व आरोपी मेघालय पोलिसांच्‍या ताब्‍यात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news