निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर. (file photo)
राष्ट्रीय

एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी प्रशांत किशोर किती कोटी फी घेतात?

Prashant Kishor | स्वतः आकडाच सांगितला; 'माझ्या रणनितीनुसार १० राज्यांत सरकारे सत्तेवर'

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : जन सूराजचे (Jan Suraj) संयोजक आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी, कोणत्याही राजकीय पक्षाला अथवा नेत्याला सल्ला देण्यासाठी ते सुमारे १०० कोटी रुपये फी घेत असल्याचा मोठा खुलासा केलाय. बिहारमधील पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान किशोर यांनी ३१ ऑक्टोबर रोजी निवडणूक रणनीती आणण्यासाठी ते नेमके किती पैसे घेतात? हे जाहीर करुन टाकले.

बेलागंज येथील एका कार्यक्रमात, त्यांनी मुस्लिम समुदायातील सदस्यांसह उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, ''लोक मला नेहमी विचारतात की तुम्ही प्रचारासाठी निधी कोठून गोळा करतात?. विविध राज्यांत माझ्या रणनितीनुसार स्थापन झालेली १० सरकारे चालली आहे.''

तुम्हाला वाटते का? माझ्याकडे पैसे नाहीत- प्रशांत किशोर

"माझ्याकडे प्रचारासाठी तंबू आणि मंडप उभारण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत, असे तुम्हाला वाटते का? मी इतका कमकुवत आहे असे तुम्हाला वाटते का? मी नेमकी किती फी आकारतो? हे बिहारमध्ये कोणाला माहित नसेल. मी केवळ एका निवडणुकीसाटी कोणाला सल्ला दिला तर , माझी फी १०० कोटी रुपये अथवा त्याहूनही अधिक आहे. पुढील दोन वर्षांसाठी मी अशाच एका निवडणुकीसाठी दिलेल्या सल्ल्याने माझ्या प्रचारासाठी निधी खर्च करु शकतो,” असे ते पुढे म्हणाले.

जन सुराजकडून चार जागांवर उमेदवार रिंगणात

बिहारमधील आगामी पोटनिवडणुकीसाठी चार विधानसभा मतदारसंघात जन सूराज पक्षाने उमेदवार उभे केले आहेत. मोहम्मद अमजद हे बेलागंजमधून त्यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. जितेंद्र पासवान इमामगंजमधून, सुशील कुमार सिंह कुशवाह रामगडमधून आणि किरण सिंह तरारीमधून निवडणूक रिंगणात आहेत. १३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. यात बेलागंज, इमामगंज, रामगड आणि तरारी या चार जागांचा समावेश आहे.

प्रशांत किशोर यांनी आज (२ ऑक्‍टोबर) त्यांच्या जन सुराज पक्षाची घोषणा केली होती. २ ऑक्टोबर २०२२ रोजीपासून त्‍यांनी बिहारमध्ये जन सुराज मोहिमेअंतर्गत पदयात्रा सुरू केली होती. गेल्‍या दोन वर्षांत त्यांनी बिहारमधील १७ जिल्ह्यांत पदयात्रा काढल्या. मनोज भारती हे त्यांच्या पक्षाचे पहिले अध्यक्ष आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT