Jantar Mantar 2.0 Internet Shut Down: कॉकरोच जनता पार्टीने जंतर मंतर २.० च्या आंदोलनाची घोषणा केली. दिल्लीत आजपासून कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते जमा होऊ लागल्यावर दिल्ली पोलिसांनी दिल्लीतील इंटरनेट सेवाच बंद करून टाकली. जसं जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट बंद हे एका हत्याराप्रमाणे वापरलं जातं तसंच ते दिल्लीत देखील वापरण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे.
मात्र आता आंदोलक हे इंटरनेट शिवाय चालणाऱ्या मेसेजिंग अॅपचा वापर करत आहेत. ब्लूटूथ बेस अॅपचा वापर करून ग्रुप कम्युनिकेशन केलं जात आहे. मात्र याबाबत प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक अपील केली आहे. त्याने हे अॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल न करण्याचा सल्ला दिला आहे.
हे अॅप BitChat App सारखं एक नेटवर्क तयार करतात. भारतात अॅपलने हे अॅप आपल्या स्टोअरमधून हटवलं आहे. बिटचॅटला ट्विटरचे सह संस्थापक जॅक डॉर्सी यांनी तयार केलं आहे.
ब्लूटूथवर चालणारी ही अॅप डिसेंट्रलाईज्ड आणि पियर टू पियर मेसेजिंग अॅप आहेत. हे अॅफ जवळपासच्या कंपेटेबल डिवाईच्या ब्लुटूथला आपली एनर्जी मिळवते. दोन हँडसेट ब्लुटूथद्वारे एख पूल तयार करतात.
ध्रुव राठीने आपल्या पोस्टमध्ये असे मेसेजिंग अॅप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नका असा टोला लगावला आहे. ध्रुव राठीने या पोस्टमध्ये जॉय नावाच्या एका व्यक्तीचा पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. हा व्यक्ती दिल्लीत अनेक ठिकाणी इंटरनेट ठप्प असल्याचं सांगतोय.
Bridgefy, Briar असे या मेसेजिंग अॅप्सची नावे आहेत. हे अॅप्स अनेक लोकं कम्युनिकेशनसाठी वापरत आहेत. हे अॅप्स ब्लुटूथ बेस्ट नेटवर्कवर काम करतात. पोस्टमधील दिलेल्या माहितीनुसार ग्रुप कम्युनिकेशनसाठी या अॅप्सचा वापर केला जाऊ नये. या अॅपमुळे इंटरनेट ब्लॉक करण्याचा प्रयत्न फसू शकतो असा उपरोधिक टोला राठीने मारला आहे. त्याने या पोस्टद्वारे एक प्रकारे हे अॅप्स इंटरनेट ब्लॉकेडचा पर्याय ठरू शकतात असं सांगितलं आहे.
ट्विटरचे सह संस्थापक जॅक डॉर्सी यांनी एक बिटचॅट अॅप तयार केलं होतं. हे अॅप इंटरनेटशिवाय देखील चालत होतं. हे एक पीअर टू पीअर ब्लुटूथ नेटवर्क बेस्ट मेसेजिंग अॅप आहे. यासाठी इंटरनेटची गरज नाही.
हे अॅप मोबाईलच्या ब्लुटूथ आपापसात कनेक्ट करून एक नेटवर्क तयार करते. त्यानंतर तुम्ही आपापसात कम्युनिकेशन करू शकतात.