चंदीगड : घराला लागलेल्या भीषण आगीत तीन मुलांसह एकाच कुटुंबातील सहाजणांचा होरपळून मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील तलंगना गावात बुधवारी रात्री ही दुर्घटना घडली.
बुधवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. तेव्हा हे कुटुंब गाढ झोपेत होते. आग वेगाने पसरली. त्यामुळे बाहेर पडता आले नाही. सहाजणांना जीव गमवावा लागला. यातून एकजण कसाबसा वाचला. तलंगना हे संग्रा उपविभागातील एक दुर्गम गाव आहे आणि रस्त्यांची सोय नसल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला. चुलीमधून ठिणग्या उडून ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.