relationship wifes Here, you can get a wife through a contract; but it costs millions, and if she approves, there's a chance of marriage.
पुढारी ऑनलाईन
भारतासारख्या संस्कारप्रधान देशात पत्नी ‘करारावर’ किंवा भाड्याने घेण्याची कल्पना विचित्र वाटू शकते; मात्र एका देशात ही पद्धत अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या थायलंड मधील पटाया शहरात ‘रेंटल वाइफ’ ही परंपरा विकसित झाली. येथे एकटे प्रवास करणारे पर्यटक तात्पुरत्या सोबतीसाठी महिलेला ठरावीक मोबदल्यावर ठेवतात. या व्यवस्थेला ‘वाइफ ऑन हायर’ किंवा ‘ब्लॅक पर्ल’ असेही म्हटले जाते.
भारतासारख्या संस्कृती आणि मूल्यांनी भरलेल्या देशात पत्नी भाड्याने घेण्यासारखी प्रथा ऐकून आश्चर्य वाटते; मात्र थायलंडमध्ये ही गोष्ट बराच काळ चालत आली आहे. दक्षिण-पूर्व आशियातील हा सुंदर द्वीपदेश आपल्या समुद्रकिनाऱ्यांमुळे आणि पर्यटनामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. वर्षभर येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते, त्यामुळे पर्यटन हेच येथील उत्पन्नाचे आणि उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. याच कारणामुळे थायलंडमधील पटाया शहरात ‘रेंटल वाइफ’ ही प्रथा उदयास आली.
येथे पुरुष तात्पुरत्या जोडीदाराच्या स्वरूपात एखाद्या महिलेला ठरावीक कालावधीसाठी ठेवू शकतात. या महिलेला ‘वाइफ ऑन हायर’ किंवा ‘ब्लॅक पर्ल’ असे संबोधले जाते. ही सुविधा प्रामुख्याने एकटे प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी असते, ज्यांना आपल्या मुक्कामादरम्यान सोबत आणि सहवास हवा असतो.
थायलंडमध्ये याकडे एका प्रकारच्या तात्पुरत्या विवाह म्हणून पाहिले जाते. ठरावीक रक्कम देऊन एखाद्या तरुणीला काही काळासाठी पत्नीच्या भूमिकेत ठेवले जाते. ठरलेल्या कालावधीत ती जोडीदारासारख्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडते. कालांतराने ही प्रथा एका संघटित व्यवसायाचे रूप धारण करू लागली आहे. यात महिलांशी काही तासांपासून ते अनेक दिवसांपर्यंतचा करार केला जातो.
अलीकडेच लावर्टे ए. इमॅन्युएल यांच्या ‘थाई टॅबू: द राइज ऑफ वाइफ रेंटल इन मॉडर्न सोसायटी’ या पुस्तकामुळे या वादग्रस्त प्रथेची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. लेखकाने आपल्या पुस्तकात थायलंडमध्ये पत्नी ‘भाड्याने’ ठेवण्याची ही पद्धत कशी झपाट्याने वाढत आहे आणि हळूहळू सामाजिक ट्रेंडसोबतच उत्पन्नाचे मोठे साधन कशी बनत चालली आहे, याचे सविस्तर वर्णन केले आहे. या व्यवस्थेत प्रेम, व्यवसाय यांचा संगम असून, थाई समाज आणि पर्यटन संस्कृतीवर तिचा खोल परिणाम झाल्याचेही पुस्तकात नमूद केले आहे.
पर्यटक पत्नी ‘हायर’ करतात
पर्यटनाशी संबंधित अहवालांनुसार, थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशी पर्यटक येतात, त्यामुळे ‘रेंटल वाइफ’चा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. दूरवरच्या आणि ग्रामीण भागातील अनेक तरुणी आर्थिक गरजांमुळे पर्यटकांची तात्पुरती पत्नी बनतात. विशेषतः पटाया येथील रेड-लाईट परिसर, बार आणि नाईट क्लबमध्ये ही प्रथा मोठ्या प्रमाणावर आढळते आणि ती आता एक व्यवसाय बनली आहे.
थायलंडमध्ये ‘रेंटल वाइफ’ ही एक वादग्रस्त प्रथा
थायलंडमध्ये ‘रेंटल वाइफ’ ही एक वादग्रस्त प्रथा मानली जाते. आर्थिक अडचणींमुळे गरीब पार्श्वभूमीतील अनेक महिला परदेशी पर्यटकांच्या तात्पुरत्या पत्नी बनून राहतात. हे कोणतेही औपचारिक लग्न नसते; तर काही दिवसांपासून ते काही महिन्यांपर्यंत चालणारा तात्पुरता करार असतो. कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी आणि अधिक कमाईसाठी अनेक महिला हा मार्ग स्वीकारतात. बहुतेक महिला बार किंवा नाईट क्लबमध्ये काम करत असतात आणि योग्य ग्राहक मिळाल्यास ‘रेंटल वाइफ’ बनण्याचा पर्याय निवडतात.
अशी ठरते मोबदल्याची रक्कम
महिलेचे वय, सौंदर्य, शिक्षण आणि कराराचा कालावधी यावर मोबदल्याची रक्कम ठरवली जाते. पुस्तकानुसार ही रक्कम १,६०० डॉलर्सपासून ते १,१६,००० डॉलर्सपर्यंत असू शकते. आश्चर्याची बाब म्हणजे, या संपूर्ण व्यवस्थेबाबत थायलंडमध्ये कोणताही स्पष्ट कायदा अस्तित्वात नाही.
याशिवाय, थायलंडमध्ये नातेसंबंध आणि वैयक्तिक स्वातंत्र्याबाबत तुलनेने लवचिक दृष्टीकोन असल्यामुळे ही प्रथा सहजपणे पसरली आहे. सरकारदेखील मान्य करते की ही व्यवस्था देशात अस्तित्वात आहे आणि पर्यटकांमुळे तिला आता व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सरकारचे म्हणणे आहे की यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदे करण्याची गरज आहे.