Delhi NCR Rain
दिल्ली-एनसीआर भागात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.  ANI
राष्ट्रीय

Delhi NCR Rain | दिल्लीत पावसाने हाहाकार! रस्ते पाण्याखाली, विमान उड्डाणे रद्द

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

दिल्ली-एनसीआर (Delhi NCR Rain) भागात शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात पाणी साचले आहे. अनेक सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी वाहने पाण्यात अडकून पडली आहेत. दरम्यान, मुसळधार पावसाने स्पाइसजेटची विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

दिल्ली विमानतळाचे छत कोसळले, १ ठार

हवामान विभागातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दिल्लीत पहाटे २.३० ते ५.३० दरम्यानच्या अवघ्या तीन तासांत जवळपास १५0 मिलिमीटर पाऊस पडला. सफदरजंग येथील मुख्य वेधशाळेत गेल्या २४ तासांत २२८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाने शहरात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पावसामुळे दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-१ च्या छताचा काही भाग वाहनांवर ५ जण जखमी झाले. तर एकाचा मृत्यू झाला.

दक्षिण पूर्व दिल्लीतील चित्तरंजन पार्कमधील काही घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे घरातील वस्तू आणि फर्निचरचे मोठे नुकसान झाले.

विमान सेवा थांबवली

टर्मिनलमधून सर्व प्रस्थाने तात्पुरती थांबवण्यात आली आहेत आणि सुरक्षेच्या कारणास्तव चेक-इन काउंटर बंद केली आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मध्यरात्रीपासून ६ प्रस्थान होणारी विमान उड्डाणे आणि १२ येणारी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

पावसाचा जोर कायम राहणार

दिल्लीत मान्सूनचे आगमन होण्याची अपेक्षा आहे. यामुळे शहरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. येत्या २ ते ३ दिवसांत दिल्लीत मान्सून आगमन होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने गुरुवारी सांगितले होते.

SCROLL FOR NEXT