हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एक विचित्र प्रेमकहाणी समोर आली आहे. येथे तीन मुलांची आई तिच्याच मुलाच्या वयाच्या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलासोबत घरातून पळून गेली आहे. पोलिस दोघांचाही शोध घेत आहेत. हे प्रकरण हाथरसच्या चंदपा क्षेत्रातील अल्हेपूर चुरसैन गावातील आहे.
गावातील रहिवासी राजेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या लहान मुलीचे लग्न अलीगडच्या जलाली येथील जयपाल यांच्या घरी लावून दिले होते. जयपाल आणि त्यांची पत्नी पूनम यांना तीन मुले आहेत. नात्यामुळे पूनमचे राजेंद्र यांच्या घरी नेहमी येणे-जाणे होते.
याचदरम्यान, पूनमची ओळख राजेंद्र यांच्या 14 वर्षीय मुलाशी झाली. भेटीगाठी वाढल्या आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. अखेर दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. पीडित वडील राजेंद्र यांनी आरोप केला आहे की, पूनमनेच त्यांच्या मुलाला फूस लावून पळवून नेले आहे. त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.