लखनौ ः पुढारी वृत्तसेवा
उत्तर प्रदेशमधील बहुचर्चित हाथरस चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. 3200 पानांच्या या आरोपपत्रात 11 जणांना आरोपी करण्यात आले असून, 676 साक्षीदार आहेत. आता शुक्रवार 4 ऑक्टोबरपासून या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
2 जुलै 2024 रोजी सिकंदरराव येथील फुलराई मुगलगढी गावात नारायण साकार हरी भोले बाबा ऊर्फ सूरजपाल यांच्या सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 121 भाविकांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर, मेघ सिंह, मुकेश कुमार, मंजू देवी, मंजू यादव, राम लडेते, उपेंद्र सिंह, संजू कुमार, राम प्रकाश शाक्य, दुर्वेश कुमार आणि दलवीर सिंग यांना अटक केली. यापैकी मंजू देवी आणि मंजू यादव या महिला आरोपींना उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे; मात्र जामीन पडताळणीअभावी त्यांची अद्याप जामिनावर मुक्तता झालेली नहाी. बुधावारी दुपारी चार वाजता मुख्य न्यायदंडाधिकारी संजीवकुमार त्रिपाठी यांच्या न्यायालयात 10 आरोपी हजर झाले.
सिकंदरराव येथील फुलराई मुगलगढी गावात नारायण साकार हरी भोले बाबा ऊर्फ सूरजपाल यांच्या सत्संग कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 121 भाविकांचा मृत्यू झाला; मात्र या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात नारायण साकार हरी भोले बाबा ऊर्फ सूरजपाल याचे नाव नव्हते. आता आरोपपत्रातही त्याच्या नावाचा उल्लेख नाही.
या घटनेत मुख्य सेवेदार देवप्रकाश मधुकर व इतर कर्मचार्यांविरुद्ध सदोष मनुष्यवध, प्राणघातक हल्ला, गंभीर दुखापत, लोकांना ओलीस ठेवणे, प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणे आणि पुरावे लपवणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. सत्संग कार्यक्रमासाठी 80 हजार लोकांसाठी परवानगी असताना तब्बल अडीच लाख लोकांची गर्दी जमवण्याच्या अटीचे उल्लंघन केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.