हाथरस चेंगराचेंगरी प्रकरण : ३२०० पानांचे आरोपपत्र, ११ आरोपी, ६७६ साक्षीदार

उद्यापासून सुनावणी होणार सुरु, आराेपपत्रात भोलेबाबाच्‍या नावाचा समावेश नाही
Hathras Satsang stampede
हाथरस येथे झालेल्‍या चेंगराचेंगरीत १२१ भाविकांचा मृत्‍यू झाला हाेता.File photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशमधील बहुचर्चित हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. ३२०० पानांच्‍या या आरोपपत्रात ११ जणांना आरोप करण्‍यात आले असून, ६७६ साक्षीदार आहेत. आता शुक्रवार ४ ऑक्‍टोबरपासून या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

हाथरस चेंगराचेंगरीत १२१ भाविकांचा मृत्‍यू

2 जुलै २०२४ रोजी सिकंदरराव येथील फुलराई मुगलगढ़ी गावात नारायण साकार हरी भोले बाबा उर्फ ​​सूरजपाल यांच्या सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ भाविकांचा मृत्‍यू झाला होता. पोलिसांनी मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर, मेघ सिंह, मुकेश कुमार, मंजू देवी, मंजू यादव, राम लडेते, उपेंद्र सिंह, संजू कुमार, राम प्रकाश शाक्य, दुर्वेश कुमार आणि दलवीर सिंग यांना अटक केली. यापैकी मंजू देवी आणि मंजू यादव या महिला आरोपींना उच्‍च न्‍यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मात्र जामीन पडताळणी अभावी त्‍यांच्‍या अद्याप जामिनावर मुक्‍तता झालेली नहाी. बुधावारी दुपारी चार वाजता मुख्य न्यायदंडाधिकारी संजीवकुमार त्रिपाठी यांच्या न्यायालयात १० आरोपी हजर झाले.

मुख्‍य सेवेदारावर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा दाखल

या घटनेत मुख्य सेवेदार देवप्रकाश मधुकर व इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवध, प्राणघातक हल्ला, गंभीर दुखापत, लोकांना ओलीस ठेवणे, प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणे आणि पुरावे लपवणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. सत्संग कार्यक्रमासाठी ८०हजार लोकांसाठी परवानगी असताना तब्‍बल अडीच लाख लोकांची गर्दी जमवण्याच्या अटीचे उल्लंघन केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

भोले बाबा उर्फ ​​सूरजपालचे नाव आरोपपत्रात नाही

सिकंदरराव येथील फुलराई मुगलगढ़ी गावात नारायण साकार हरी भोले बाबा उर्फ ​​सूरजपाल यांच्या सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ भाविकांचा मृत्‍यू झाला होता. मात्र या प्रकरणी दाखल झालेल्‍या गुन्‍ह्यात नारायण साकार हरी भोले बाबा उर्फ ​​सूरजपाल याचे नाव नव्हते. आता आरोपपत्रही त्‍याच्‍या नावाचा उल्‍लेख नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news