Harvard MIT students EC pudhari
राष्ट्रीय

Harvard MIT students EC: CJP संस्थापक दिपकेला जशास तसे उत्तर देण्यास Harvard-MIT चे ४०० भारतीय वंशाचे विद्यार्थी सज्ज

जगातील २७ देशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या ४०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आणि रिसर्चर्स यांनी भारतीय निवडणूक आयोगाचे जोरदार समर्थन केलं आहे.

Anirudha Sankpal

Harvard MIT students Support EC: जगातील २७ देशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या ४०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आणि रिसर्चर्स यांनी भारतीय निवडणूक आयोगाचे जोरदार समर्थन केलं आहे. त्यांनी विरोधी पक्षाने निवडणूक आयोगाविरूद्ध घेतलेल्या भूमिकेवर टीका केली. भारताला अराजकतेपासून वाचवा अशी हाक त्यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी संयुक्त वक्तव्य प्रसिद्ध केलं आहे. त्यांनी अशा भूमिकेमुळे देशाच्या संवैधानिक संस्थांवरचा लोकांचा विश्वास कमी होऊ शकतो असे मत देखील त्यांनी व्यक्त केलं.

या संयुक्त वक्तव्यावर हस्ताक्षर करणाऱ्यांनी सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेला देखील त्याच्याच भाषेत आव्हान दिलं आहे. हस्ताक्षर करणाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा दाखला देत लोकशाहीत मतभेदांचे समाधान हे संवैधानिक पद्धतीने व्हाव असं वक्तव्य केलं. त्यांनी लोकशाही प्रक्रियेला आव्हान देण्यासाठी रस्त्यावर अराजक प्रदर्शन करण्यावर टीका केली असून जर संवैधानिक लोकशाहीच्या रक्षणाच्या नावावर त्यालाच कमकूवत करण्यात येऊ नये असं मत व्यक्त केलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT