Harish Rawat Quits Congress pudhari
राष्ट्रीय

Harish Rawat Quits Congress: परीक्षा घोटाळ्याचे भूत आता काँग्रेस नेत्यांच्या मानगुटीवर... माजी मुख्यमंत्र्यांनी पक्षालाच ठोकला राम राम

Anirudha Sankpal

Harish Rawat Quits Congress: उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्याच्या वैयक्तिक सहाय्यक चंदन सिंह जीना यांच्यावर इन्फोर्समेंट डारेक्टोरेट अर्थात ईडीने रेड टाकली त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या वैयक्तिक सहाय्यकाची मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशी सुरू आहे. हे प्रकरण २०१६ चे असून राज्य भरती परीक्षांमधील अनियमिततेबाबत ही चौकशी सुरू आहे. चंदन सिंह जीना यांच्याकडून कॅश, सोने आणि महागडी घड्याळे रिकव्हर करण्यात आली आहेत.

पक्षाच्या लढाईला धक्का पोहचू नये म्हणून...

काँग्रेस नेते हरीश रावत यांनी, ते उत्तराखंड प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत आहेत. पक्षाची जी सध्या लढाई सुरू आहे त्याला कोणताही धक्का पोहचू नये आणि ती लढाई कमजोर होऊ नये म्हणून आपण या पदांचा राजीनामा देत असल्याचं सांगितलं.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले'मी माझ्या इष्ट देवतेचे स्मरण करून हा मोठा निर्णय घेतला आहे. मी कोणतीही सरकारी पदावर नाहीये. त्यामुळं त्यावरून राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. असं असलं तरी मी उत्तराखंड प्रदेश काँग्रेस समितीच्या आणि राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेस वर्किंग कमिटीचा स्थायी आमंत्रित पदाचा देखील राजीनामा देत आहे. मी दोन्ही पदावरून आदरपूर्वक पायउतार होत आहे. कारण मला माझ्यामुळं पक्षाची लढाई कुठं कमकुवत होऊ नये असं वाटतं.'

मनी लाँडरिंग प्रकरणी धाडसत्र

शुक्रवारी रात्री ईडीने एक वक्तव्य प्रसिद्ध करून त्यांनी जीना यांच्यावर गुरूवारी धाड टाकली होती. त्यावेळी त्यांनी ३२ लाख रूपये कॅश आणि एक डझन महागडी घड्याळे हस्तगत केल्याचा दावा केला. ईडीने १० सप्टेंबर रोजी मनी लाँडरिंग प्रकरणी या धाडी टाकल्या होत्या.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार UKSSSC चे तत्कालीन चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्या घरी ही धाड टाकण्यात आली. तसेच एक्झाम कंट्रोलर, ओएमआर प्रक्रियेत सामील असलेला खासगी कम्प्युटर एजन्सीचा मालक आणि यासर्वांशी संबंधित असलेला मध्यस्थ यांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्र्यांचे माजी OSD

त्याचबरोबर चंदन सिंह जीना यांच्या देखील घराची झडती घेण्यात आली होती. जीना यांनी हरीश रावत यांचे ओएसडी म्हणून काम केलं आहे. हरीश रावत हे २०१४ ते २०१७ पर्यंत उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT