Viral Video Milk Bath After Divorce :
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यात एक मुलगा आपला घटस्फोट सेलिब्रेट करताना दिसत आहे. त्यानं दुधाचा अभिषेक करून आपलं शुद्धीकरण करून घेतलं. यामुळंच त्याचा हा सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे त्यानं सेलिब्रेशन करताना एक केक देखील कापला होता. त्यावर हॅप्पी घटस्फोट १२० ग्रॅम सोनं अन् १८ लाख कॅश असं लिहिलं होतं.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसतंय की एक व्यक्ती चेहऱ्यावर हास्य घेऊन पाटावर बसला होता. त्याची आई त्याच्यावर दुधाचा अभिषेक घालत होती. त्याची आई जणू मुलांचे शुद्धीकरणच करत होती. या व्हिडिओला सिंगल आहे... खुश आहे.... स्वतंत्र आहे... माझं आयुष्य... माझे नियम... सिंगल आणि आनंदी!' असं कॅप्शन देण्यात आलं होतं.
या व्हायरल व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या व्यक्तीची आणि त्याच्या सकारात्मकतेची स्तुती केली आहे. तर काहींनी त्याच्यावर अशा प्रकारे आपल्या खासगी आयुष्याचं प्रदर्शन करण्यावरून टीका देखील केली आहे.
या व्हिडिओनंतर संबंधित व्यक्तीनं अजून एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो आपल्याला दिलेल्या पाठिंब्यासाठी सर्वांचे आभार मानताना दिसतोय. यावरून घटस्फोट झाल्यानंतर देखील तुमचं आयुष्य संपत नाही. तुम्हाला अजून एक सुरूवात करण्याची संधी मिळते असा संदेश दिला गेला आहे.
एका नेटकऱ्यानं तर व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती हा कॉमेडियन वीर दास यांच्यासारखा दिसतोय असं म्हणूत विनोद केला. नंतर वीर दासनं हा व्हिडिओ स्वतः शेअर केला आणि हा मी नाहीये असं सांगितलं.