Gyanesh Kumar Retirement pudhari
राष्ट्रीय

Gyanesh Kumar Retirement: ज्ञानेश कुमार कधी होत आहेत निवृत्त, त्यांच्यानंतर कोण होणार मुख्य निवडणूक आयुक्त?

Anirudha Sankpal

Gyanesh Kumar Retirement: इंडियन एक्सप्रेसच्या एका बातमीनंतर देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अख्या देशात SIR राबवून लोकांना कामाला लावणाऱ्या ज्ञानेश कुमार यांच्यावर एकाधिकार शाही राबवून निर्णय घेतल्याचा आणि मतदार यादीतून चुकीच्या पद्धतीनं उडवल्याचा आणि समाविष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागल्यावर आता त्यांच्या करिअरबाबत देखील लोकांची उत्सुकता वाढली आहे. विशेष म्हणजे ज्ञानेश कुमार यांची ३७० कलम हटवण्यात आणि राम मंदीर ट्रस्ट निर्माण करण्यात देखील मोठी भूमिका आहे.

निवडणूक आयोगात दुफळी?

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यात तब्बल १४ वेळा ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांवर अधिकृतरित्या आक्षेप घेतला होता. अनेक निर्णय हे त्यांना अंधारात ठेवून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे ज्ञानेश कुमार हे विरोधकांच्या रडावर काही पहिल्यांदा आलेले नाहीत. राहुल गांधी यांनी मत चोरीचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. त्यावेळी ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांना आरोप प्रतिज्ञापत्रावर लिहून द्या नाही तर माफी मागा असे वक्तव्य केलं होतं. तेव्हापासून ते प्रत्येक राज्याच्या निवडणुकांवेळी टीकेचे धनी होत आले आहेत.

कधी होणार निवृत्त?

ज्यावेळी ज्ञानेश कुमार यांना देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त बनवले गेलं त्यावेळी देखील विरोधकांनी टीका केली होती. २०२३ मध्ये सीईसी आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने सर्वात आधी ज्ञानेश कुमार यांचीच निवड केली होती. या पॅनलमध्ये देशाचे मुख्य न्यायाधीशांच्या जागी केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना सामील केलं होतं. त्यामुळं तीन सदस्यांच्या पॅनलमध्ये दोन सदस्य हे सरकारचेच होते.

विरोधी पक्षाकडून राहुल गांधी हे एकमेव सदस्य होते. त्यांनी राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती. त्यांनी जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत निवड प्रक्रिया पुढे ढकलावी अशी मागणी केली होती. मात्र ज्ञानेश कुमार यांची भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आता त्यांचा कार्यकाळ हा २६ जानेवारी २०२९ मध्ये समाप्त होणार आहे.

ज्ञानेश कुमार यांचे करिअर

उत्तराखंड कॅडरचे १९८८ बॅचचे आयएएस असलेल्या ज्ञानेश कुमार यांनी आयआयटी कानपूरमधून सिव्हिल इंजिनियरिंग केलं आहे. त्यानंतर त्यांनी ICFAI चे बिजनेस फायनान्स आणि हार्वर्ड विद्यापीठातून एनव्हायरमेंटल इकॉनॉमिक्सचे शिक्षण घेतलं होतं.

ज्ञानेश कुमार यांच्यानंतर कोण?

विवेक जोशी हे १९ फेब्रुवारी २०२५ मध्ये निवडणूक आयोगात सामील झाले होते. या दिवशी ज्ञानेश कुमार हे सीईसी झाले होते. विवेक जोशी हे हरियाणा कॅडरचे १९८९ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी हरियाणाचे मुख्य सचिव म्हणून काम केलं आहे. ज्ञानेश कुमार यांच्या आधी सुखबीर संधू निवृत्त होणार आहेत. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांचा सीईसी म्हणून कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर विवेक जोशी मुख्य निवडणूक आयुक्त बनू शकतात. मात्र त्यांची देखील निवड ही संसदेने ठरवून दिलेल्या नियमांनुसार केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT