Gurmeet Ram Rahim Acquits: डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम याला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. त्याची पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2002 मध्ये स्थानिक वृत्तपत्राचे संपादक रामचंद्र छत्रपती यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. या पत्रकाराने हरियाणामधील सिरसा येथील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयाबाबत खळबळजनक दावे केले होते.
गुरमीत राम रहीमला खालच्या न्यायालयानं २०१९ मध्ये पत्रकार छत्रपती यांची हत्या केल्या प्रकरणी २०१९ मध्ये दोषी ठरवून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर सात वर्षानंतर डेरा सच्चा सौदाच्या प्रमुखाला उच्च न्यायालायनं निर्दोष सोडून दिलं आहे.
छत्रपती यांची त्यांच्या घराबाहेर २००२ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ते स्थानिक पूरा सच हे वर्तमानपत्र चालवत होते. त्यांनी डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात लैंगिक शोषण होत असल्याबद्दलचं निनावी पत्रा त्यांच्या वृत्तपत्रात छापलं होतं.
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह हा २०१७ मध्ये दोन शिष्यांवर बलात्कार केल्या प्रकरणी २० वर्षाचा तुरूंगवास भोगत आहे. या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर तो हरियाणाच्या रोहतकमधील सुनारिया जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.
दरम्यान, पत्राकर हत्या प्रकरणी डेरा सच्चा सौदा प्रमुखाच्या वकिलांनी गुरमीत राम रहीम यांना सीबीआयने या प्रकरणात चुकीच्या पद्धतीनं गोवलं असल्याचा दावा केला होता. या प्रकरणात पहिली चार्जशीट ही निर्मल, कुलदीप आणि कृष्णन लाल यांच्याविरूद्ध दाखल करण्यात आली होती. यापौकी कोणत्याही आरोपीनं गुरमीत राम रहीम यांचा या हत्याकांडाचे षडयंत्र रचण्यात हात होता असं सांगितलंलं नाही.'
वकिलांनी कृष्णन लाल यांना सीबीआय अधिकाऱ्यांनी टॉर्चर केलं होतं. त्यानंतर डेरा सच्चा सौदाच्या प्रमुखाचे नाव बदला घेण्यासाठी यात टाकण्यात आलं. सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे षडयंत्राचे वर्जन तयार केले. असा युक्तीवाद केला होता.