गुरुमीत राम रहीम पुन्हा जेलच्या बाहेर

Gurmit Ram Rahim | २१ दिवसांची फर्लो रजा मंजूर
Gurmit Ram Rahim
राम रहीमFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍कः स्‍वंयघोषीत अध्यात्‍मिक गुरु गुरमित राम रहीम सिंह ला २१ दिवसांची फर्लो रजा मिळाली आहे. बलात्‍काराच्या आरोपाखाली दोषी ठरल्‍याने गुरुमित राम रहिमला २० वर्षाची सक्‍तमजुरीची शिक्षा मिळालेली आहे. हरियाणातील रोहतकमधील सुनारिया जेलमध्ये तो सध्या सजा भोगत असून. बुधवारी त्‍याला जेलमधून सोडण्यात आले.

यावर्षी बाबाला दुसऱ्यांदा जेलच्या बाहेर राहण्याची मुभा मिळाली आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये बाबाला दिल्‍ली विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ३०दिवसांची पॅरोल मंजूर झाली होती. आता पुन्हा २१ दिवसांची रजा मिळाली आहे. या रजेच्या काळात तो सिरसा येथील डेरा मुख्यालयात राहणार आहे. आतापर्यंत बाबा राम रहीमला विधानसभा व लोकसभेच्यावेळी पॅरोल व फर्लो मिळत आली आहे. पंजााब, हरयाणा, दिल्‍ली, उत्तर प्रदेश, राजस्‍थानमध्ये डेरा सच्चाच्या अनुयायांची संख्या मोठी आहे.

दरम्‍यान पंचकुला येथील न्यायालयाने २०१७ मध्ये गुरुमीत राम रहीमला दोन महिला शिष्‍यांच्या बलात्‍कारप्रकरणी दोषी ठरवले होते. तसेच त्‍याला दोन्ही पिडीत महिलांना १५ लाखांची भरपाई देण्याचेही आदेश दिले होते. त्‍याबरोबर पत्रकार रामंचंद्र छत्रपती हत्‍याकांडप्रकरणी जानेवारी २०१९ मध्ये आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच २०२१ मध्ये विशेष सीबीआई न्यायालयाने गुरुमीत राम रहीमला दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news