Viral Story pudhari
राष्ट्रीय

Viral Story : गुजराती कुटुंबानं रेल्वेच्या AC डब्ब्यात थाटलं किचन; Civic Sense चे केले सँडविच

gujarati family prepares food inside train : रेल्वेचा काही नागरिक भलत्याच कामासाठी वापर करतात. सध्या सोशल मीडियावर याबाबतचाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Anirudha Sankpal

Viral Story gujarati family prepares food inside train : रेल्वे ही जगभरात एक प्रवासाच साधन म्हणून ओळखली जाते. याचा मुळ उद्येश हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे हा आहे. या प्रवासात प्रवाश्यांना रल्वे डब्यात बसण्याची जास्तीजास्त झोपण्याची मुभा असते. मात्र या रेल्वेचा काही नागरिक भलत्याच कामासाठी वापर करतात. सध्या सोशल मीडियावर याबाबतचाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

यात एक गुजराती कुटुंब रेल्वेच्या डब्ब्यात वर्तमानपत्र पसरवून त्यावर खाद्य पदार्थ तयार करण्याचा उपक्रमच राबवत असल्याचं दिसत आहे. यावरून आता सिविक सेन्स आणि रेल्वेतील हायजीनबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

बर्थ की किचन काऊंटर?

या व्हिडिओत एक गुजराती कुटुंबाने एक ३ टायर AC मधील डब्ब्यात मधल्या बर्थवर जवळपास एक स्वयंपाक घरच निर्माण केलं होतं. त्यांनी वरच्या बर्थवर वर्तमान पत्र पसरवून सँडविच तयार करण्यास सुरूवात केली. एक महिला हे सँडविच घरातील इतर व्यक्तींना सर्व्ह करत होती. तिने वरच्या बर्थवर ब्रेड, भाज्या आणि चटणी ठेवली होती.

इलेक्ट्रिक टोस्टर आणायला हवा होता

विशेष म्हणजे ज्यावेळी ही महिला हे सँडविच घरातील लोकांना सर्व्ह करत होती त्यावेळी दुसरी महिला आपण इलेक्ट्रिक टोस्टर आपल्यासोबत आणला असता तर बरं झालं असतं. पुढच्यावेळी लक्षात ठेवू असं म्हणताना दिसत आहे. त्यांना बहुदा आता ग्रील सँडविचची इच्छा झाली असावी.

ही सहज केलेली कमेंट चर्चेचा विषय ठरली आहे. या व्हिडिओवर समिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. काही नेटकऱ्यांना कुटुंबाने घरचं खाणं सर्व्ह करण्यासाठी रेल्वेचा केलेला पुरेपूर वापर आवडला तर काहींना इतर प्रवासी देखील हे कम्पार्टमेंट शेअर करत आहेत याचं भान असायला हवं अशी प्रतिक्रिया देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT