Dhule Surat ST BUS ACCIDENT Pudhari
राष्ट्रीय

Dhule Surat ST Bus Accident: गुजरात सीमेवर एसटी बसचा भीषण अपघात, 7 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

Dhule ST Bus Depo: मंगळवारी संध्याकाळी गुजरातच्या बारडोलीजवळ तिहेरी अपघात झाला. सुरतहून धुळ्याकडे जाणाऱ्या एसटी बसला ट्रॅक्टरने धडक दिली.

पुढारी डिजिटल टीम

Gujarat Bardoli St Bus Accident News

धुळे : गुजरातच्या बारडोलीजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या दोन बस आणि ट्रॅक्टरच्या विचित्र अपघात झाला. या अपघातामुळे बसला लागलेल्या आगीत होरपळून सात प्रवाशांचा मृत्यू झाला.

मंगळवारी संध्याकाळी गुजरातच्या बारडोलीजवळ तिहेरी अपघात झाला. सुरतहून धुळ्याकडे जाणाऱ्या एसटी बसला ट्रॅक्टरने धडक दिली. या धडकेनंतर सुरत- धुळे बस ही विरुद्ध दिशेने येणाऱ्या जळगाव- सुरत बसला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की जळगाव आगारातून निघालेली बस दोन वेळा पलटली आणि बसने पेट घेतला. ही आग भीषण असल्यान बसमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या आगीत आत्तापर्यंत सात प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

घटनास्थळी पोलिस पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. बसमध्ये नेमके किती प्रवासी होते हे अद्याप समजू शकले नाही. आगीची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

महाराष्ट्राच्या आगारातील अधिकारी अपघातस्थळी रवाना

सुरत प्रशासनाने अपघाताची माहिती धुळे एसटी डेपोला दिली. अपघाताचे वृत्त समजताच आगारातील अधिकाऱ्यांनी तातडीने बारडोलीला धाव घेतली. या अपघातात 30 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. यातील 10 जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.

धुळे आगारातील चालकाचा अपघातात मृत्यू

अपघातात धुळे आगारातील चालकाचा मृत्यू झाला आहे. मात्र, अद्याप त्यांचे नाव समजू शकलेले नाही. सुरतचे जिल्हाधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केला आहे. सध्या मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT