नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: खासगी वृत्तवाहिन्यांना नैसर्गिक आपत्तीच्या बातम्या दाखवताना अनेक खबरदारी घ्यावी लागणार आहे. अशा बातम्या दाखवताना घटनेची तारीख आणि वेळही दाखवणे बंधनकारक असेल. घटनेची तारीख आणि वेळ न दाखवल्यास सरकार कारवाई करू शकते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
दूरचित्रवाणी वाहिन्या नैसर्गिक आपत्ती आणि मोठ्या अपघातांच्या बातम्या अनेक दिवस सतत दाखवत असतात, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे मत आहे. त्याच्या फुटेजमध्ये घटनेच्या दिवशी घडलेली तीच जुनी दृश्ये दाखवण्यात येतात. त्यामुळे हे फुटेजही सध्याच्या काळातील असल्याचे प्रेक्षकांना वाटते. कारण अशा फुटेज खाली तारीख आणि वेळेचा उल्लेख नसतो. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये भीती आणि दहशत निर्माण होते.