Gorakhpur Crime News pudhari photo
राष्ट्रीय

Mother Killed Daughter: आई झाली हैवान! निष्पाप मुलीचं कुऱ्हाडीनं शीर केलं धाडावेगळं; ब्लॅक मॅजिकचा संशय?

Mother Killed Daughter: ३ वर्षाच्या मुलीच्या पालन पोषणासाठी वडिलांनी महिन्यापूर्वीच केला होता दुसरा विवाह

Anirudha Sankpal

Gorakhpur Crime News Mother Killed Daughter: आई अन् मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथं झाली आहे. या घटनेमुळं लोकांच्या अंगावर काटा आला असून गोरखपूरच्या उत्तरी ग्रामीण भागात एका आईनं ३ वर्षाच्या आपल्या मुलीचे शीर कुऱ्हाडीनं धडावेगळं केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हैवान सावत्र आई

पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर वडिलांनी ३ वर्षाच्या चिमुकलीला सांभाळण्यासाठी दुसरं लग्न केलं. मात्र मुलीची ही दुसरी आईच तिचा काळ बनली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून पोलिसांना या धक्कादायक कृत्यामागं काळी जादू किंवा अंधश्रद्धा असल्याचा संशय आहे.

ही घटना पिपाईच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमलिया उर्फ विजहरा या ठिकाणची आहे. मंगळवारी रात्री त्रिवेणी मौर्य यांची नवविवाहित पत्नी पूजा मौर्यने ३ वर्षाची सावत्र मुलगी आदित्या उर्फ लाडो हिचे शीर धारदार शस्त्रानं कापून तिचा खून केला. याच धारदार कुऱ्हाडीनं निर्दयी पूजानं या निरागस मुलीचे शीर धडावेगळं केलं. ही सर्व घटना एका बंद खोलीत झाली.

खोलीत देवी देवतांचे फोटो अन्...

विशेष म्हणजे या खोलीत डबल बेडच्या बरोबर शेजारी देवांचे फोटो लावण्यात आले होते. तिथं पूजा केल्याचं देखील दिसत होतं. यामुळेच तपास करणाऱ्या पोलिसांना या घटनेत काळी जादू आणि तंत्रविद्येचा अँगल देखील दिसत आहे. पोलीस आता त्या दिशेनं तपास करत आहेत.

मृत मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, मुलीचे पालन पोषण करण्यासाठी त्यांनी जानेवारी महिन्यात दुसरं लग्न केलं होतं. त्रिवेणी यांनी सांगितलं की त्यांची दुसरी पत्नी पूजा सायंकाळी खोलीतून कधी बाहेर पडत नव्हती. मात्र ज्या दिवशी ही घटना झाली त्या दिवशी रात्री ११ ते १२ च्या दरम्यान ती घराबाहेर उभी होती. याचवेळी तिला घराबाहेर जाताना पाहिलं होतं. मला शंका आल्यावर मी तिचा पाठलाग केला. त्यावेळी ती पळून जाऊ लागली. मी आरडा ओरडा केल्यावर ग्रामस्थांनी तिला पकडलं. त्यानंतर तिला खोलीत घेऊन गेल्यावर तिथं माझ्या मुलीचा मृतदेह पडल्याचं दिसून आलं.

पोलिसांनी काय माहिती दिली?

यानंतर त्रिवेणी यांनी पोलिसांना कळवलं. पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी पूजा मौर्यची चौकशी केली. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. गोरखपूर चौरीचौरा सर्कल सीओ रत्नेश्वर सिंह यांनी सांगितलं की एका महिलेने आपल्या मुलीवर धारदार शस्त्रानं हल्ला केल्याची माहिती पिपराईच पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचली. त्यांनी चौकशी केला असता या महिलेचा जानेवारी महिन्यात त्रिवेणी यांच्याशी विवाह झाला होता.

या महिलेनं आपल्या ३ वर्षाच्या मुलीचा धारदार शस्त्रानं खून केला होता. यानंतर महिलेला अट करण्यात आली असून तिनं हे कृत्य का केलं याचा तपास केला जात आहे. गुन्हा दाखल करणे आणि इतर कायदेशीर करावाई केली जात आहे. सध्याच्या घडीला घटनास्थळी शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT