अंगावर ५ कोटींचे सोने, तरीही निश्चिंत! बाबा म्हणाले, ‘देवावर विश्वास.., केसालाही लागणार नाही धक्का..’ File Photo
राष्ट्रीय

अंगावर ५ कोटींचे सोने, तरीही निश्चिंत! बाबा म्हणाले, ‘देवावर विश्वास.., केसालाही लागणार नाही धक्का..’

प्रयागराजच्या वाळूत एक बाबा असे आहेत ज्यांच्यावर प्रत्‍येकाची नजर खिळून राहते. डोक्यापासून पायापर्यंत त्‍यांच्या अंगावर सोन्या-चांदीची अभूषणे लक्ष वेधून घेतात.

पुढारी वृत्तसेवा

google golden baba wears 5 crore gold faith in god prayagraj magh mela

प्रयागराज : पुढारी ऑनलाईन

प्रयागराजच्या वाळूत एक बाबा असे आहेत ज्यांच्यावर प्रत्‍येकाची नजर खिळून राहते. डोक्यापासून पायापर्यंत त्‍यांच्या अंगावर सोन्या-चांदीची अभूषणे लक्ष वेधून घेतात. त्‍यांचे नाव आहे गुगल गोल्डन बाबा....जेंव्हा त्‍यांना विचारण्यात आले की, इतके सोने अंगावर घातल्याने तुम्हाला भीती वाटत नाही? यावर ते स्मित हास्य करत ज्याच्यासोबत प्रभू आहे त्‍याच्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही असे म्हणतात.

प्रयागराजच्या संगम किणाऱ्यावर लागलेल्या माघ मेळ्यात अनेक साधू संत आले आहेत. मात्र एक बाबा आहेत जे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. जो कोणी त्‍यांना पहिल्यांदा पाहतो तो पाहातच राहतो. हे बाबा डोक्यापासून पायापर्यंत सोन्या-चांदीच्या अभूषणांनी लगडलेले आहेत. हातात डझनभर सोन्याच्या चमचमत्‍या अंगठ्या, मनगटात कंगण, गळ्यात जाडजूड सोन्याची चेन, रूद्राक्षाची माळ आणि शंकराची माळ, डोक्यावर चांदीचा मुकूट.... या गुगल गोल्डन बाबांचे खरे नाव मनोज आनंद महाराज असे आहे. बाबांनी शरीरावर घातलेल्या सोन्या-चांदीच्या अभूषणांची किंमत आजच्या घडीला 5 कोटींच्यावर असल्याचे सांगितले जाते.

इतके सोने-चांदी अंगावर घालून फिरताना भीती वाटत नाही का? असा प्रश्न विचारल्यावर बाबा सुरूवातील हासले आणि म्हणाले, माझ्यावर चार वेळा हल्ले झाले आहेत. मात्र गिरिधारीची साथ असल्याने मला कशाची भीती वाटत नाही. प्रयागराजच्या मेळ्यात लाखो भक्त श्रद्धेची डुबकी घेण्यासाठी हजेरी लावत असतात. या दरम्यान साधू-संत वेगवेगळ्या वेषभूशेत दिसून येतात.

या सर्वांच्यात गुगल बाबांचा अंदाज थोडा निराळा आहे. लोक लांबूनच त्‍यांना ओळखतात. कोणी मोबाईल काढून त्‍यांचा व्हिडिओ बनवते. तर कोणी त्‍यांचा सेल्फी घेते. बाबा चांदीच्या भांड्यामध्ये जेवन करतात. बाबांनी सांगितले की, या सगळ्याची सुरूवात गळ्यातल्या एका चेनने झाली. या गोष्टींची हौस हळूहळू वाढत गेला आणि आज सोन्या-चांदीची खूप सारी अभूषणे आज अंगावर धारण केली आहेत. बाबांकडे लड्डू गोपाळची एक सोन्याची मूर्तीही आहे. जीला ते नेहमी आपल्या हातात ठेवतात.

सोन्याची आभूषणे धारण करण्याचे कारण विचारताच बाबा म्हणतात.. आम्ही क्षत्रिय आहोत. तुम्ही इतिहासात पाहा.... राजे-महाराजे सोने धारण करत होते. सोने हे शौर्य,समृद्धी आणि परंपरेचे प्रतिक आहे. मी हे सर्व गर्वाने धारण करत नाही. तर माझ्या हौसेसाठी धारण करतो. बाबा म्हणतात कोणाला माउंट एव्हरेस्टवर चढण्याचा छंद असतो. कोणाला पतंग उडवण्याचा छंद असतो तसा मला सोन्याची अभूषणे धारण करण्याचा छंद आहे.

गुगल बाबा सध्या आगरा येथून बनवून घेतलेले चांदीची पादत्राने घालून प्रवास करतात. ज्याची किंमत तब्बल 5 लाख रूपये इतकी आहे. ते सांगतात जेंव्हा चांदीचा दर 40 हजार रूपये किलो होता तेंव्हा ही पादत्राणे बनविण्यात आली आहेत. मात्र आता मी त्‍याचा त्‍याग केला आहे. याच्या पाठिमागे बाबांचा एक संकल्प आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते विनाचप्पल किंवा बुट घालता अनवाणी देशभर भ्रमंती करणार आहेत. संकल्प पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ते साडेचार किलो वजनाची पादत्राणे धारण करणार आहेत.

ते दावा करतात की, त्‍यांच्यावर चार वेळा हल्ला करण्यात आला. मात्र चारही वेळा ते मारेकरी पकडले गेले आणि त्‍यांना जेलमध्ये टाकण्यात आले. बाबांना देवावर विश्वास आहे कि तोच त्‍यांचा रक्षक आहे.

बाबा म्हणाले.... फळ प्रभू देतात...

गूगल बाबा म्हणातात... माझी परमात्‍म्यावर श्रद्धा आहे. ते रोज पुजा-पाठ, दान-पुण्य कर्म आणि धार्मिक अनुष्ठाण करतात. त्‍यामुळे माघ मेळ्यात ते सर्वांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. सोन्या-चांदीची आभूषणे घातलेले बाबा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यावर बाबा म्हणतात नशिब देव लिहितो. ज्यांच्या नशिबात जे लिहिलंय तेच त्‍या व्यक्तीला मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT