AI Doodle Portrait: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि इमेज जनरेशन टूल्समुळे सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड्स येत आहेत. काही दिवसांपूर्वी गूगलच्या 'नॅनो बनाना' टूलमुळे 3D मॉडेल आणि साडीचा ट्रेंड लोकप्रिय झाला होता. आता तसाच 'डूडल फोटो पोर्ट्रेट' या नव्या ट्रेंडने धुमाकूळ घातला आहे. यामध्ये लोक गूगल जेमिनीच्या मदतीने स्वतःचे अत्यंत मजेदार कार्टून स्केच बनवून शेअर करत आहेत.
हे नवे स्केच पोर्ट्रेट्स लहानपणी आपण वहीच्या मागील पानांवर किंवा स्लेटवर काढलेल्या रेखाटनांची आठवण करून देतात. विशेष म्हणजे, यासाठी आपल्याला कोणत्याही विशेष ग्राफिक्स ज्ञानाची गरज नाही. गूगल जेमिनीच्या 'नॅनो बनाना' या टूलचा वापर करून फक्त एक विशिष्ट प्रॉम्प्ट कॉपी-पेस्ट केल्यास, अवघ्या काही सेकंदांमध्ये तुमचा हा खास फोटो तयार होतो.
गूगल जेमिनीचा वापर करून डूडल पोर्ट्रेट फोटो बनवण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे आहे:
ॲप उघडा आणि लॉगइन करा: सर्वप्रथम आपल्या फोन किंवा PC मध्ये जेमिनी ॲप उघडून आपल्या गूगल अकाउंटने लॉगइन करा.
'Create Images' निवडा आणि प्रॉम्प्ट लिहिण्याच्या जागेखालील टूल्समध्ये केळ्याच्या आयकॉनसह दिसणारा 'Create Images' हा पर्याय निवडा. यामुळे इमेज निर्मितीसाठी नॅनो बनाना टूल सक्रिय होईल.
फोटो निवडा: '+ आयकॉन'वर क्लिक करून तुमचा पोर्ट्रेट फोटो निवडा. तुम्ही गॅलरीतील फोटो निवडू शकता किंवा लगेच फोटो क्लिक करू शकता.
प्रॉम्प्ट पेस्ट करा: फोटो निवडल्यानंतर प्रॉम्प्ट द्या.
स्केच तयार: गूगल जेमिनी काही क्षणांत तुम्हाला तुमचा आकर्षक डूडल पोर्ट्रेट फोटो तयार करून देईल.
हा नवा आणि मजेदार ट्रेंड सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, प्रत्येकजण स्वतःचा हा खास स्केच पोर्ट्रेट बनवून आनंद घेत आहे.