Gold Silver Price Dropped:
दिवळीनंतर सोनं चांदीची झळाळी सातत्यानं कमी होत आहे. सोनं चांदीचे दर कमी होण्याचा सिलसिला अजूनही सुरू असून गेल्या १४ दिवसात एक दोन दिवसांचा अपवाद वगळता रोज सोनं चांदीचे दर कमी होत आहेत. सोनं आणि चांदी दिवाळीच्या दरम्यान रेकॉर्ड ब्रेक किंमतीवर होतं. तिथून ते सतत खाली येत आहे. देशांतर्गत बाजारपेठेत देखील गेल्या १७ ऑक्टोबर पासून सोनं १० हजार रूपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदी जवळास २१ हजार रूपयांनी स्वस्त झालं आहे.
देशांतर्गत बाजारपेठेत शुक्रवारी सोन्याच दर हा १ लाख २० हाजर १०० रूपयांपर्यंत आला. सोन्याचा दर जवळपास ५७० रूपयांनी स्वस्त झाला आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईट IBJA.Com नुसार १४ दिवसांपूर्वी म्हणजे १७ ऑक्टोबरला १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर हा १ लाख ३० हजार ८७४ रूपये इतका होता. त्या तुलनेत आजच्या दराचं कॅल्क्युलेशन केलं तर सोनं १० हजार ७७४ रूपयांनी स्वस्त झालं आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX Gold Rate) सोन्याच्या दरात झालेल्या बदलांवर एक नजर टाकूयात १७ ऑक्टोबरला ५ डिसेंबर एक्सपायरी डेट असलेल्या प्रती १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची वायदा किंमत ही १ लाख २७ हजार होती. जी ७ नोव्हेंबर रोजी कमी होऊन १ लाख २१ हजार ०३८ रूपये इतकी आली. म्हणजे या दिवसांमध्ये सोनं जवळपास ५ हजार ९७० रूपयांनी स्वस्त झालं आहे.
आपण चांदी (Silver), बद्दल बोलायचे झाल्यास, देशांतर्गत बाजारात चांदीच्या दरात 14 दिवसांत सुमारे 21,000 रुपये प्रति किलो एवढी मोठी घट झाली आहे.
IBJA च्या दरांनुसार (1 किलोग्राम) 17 ऑक्टोबरच्या संध्याकाळी भाव हा 1,69,230 होता. तर मागील शुक्रवारी हा दर 1,48,275 इतका होता. या १४ दिवसात चांदीच्या दरात जवळपास 20,955 रूपयांची घसरण झाली आङे.
14 दिवसांपूर्वी चांदीचा वायदा भाव 1,56,604 प्रति किलो होता. त्यात आतापर्यंत 8,815 रूपयांची घसरण झाली आहे.
उच्चतम वायदा भावाशी तुलना (High Futures Price):
चांदी आपल्या उच्चांकी दर 1,70,415 वरून 22,626 रुपयांनी स्वस्त झाली आहे. तर सोनं 11,256 रुपयांनी स्वस्त झाले आहे.