Gold Price Today
सोन्याचा दर ४,२०० रुपयांनी कमी झाला आहे. file photo
राष्ट्रीय

Gold Prices Today | खुशखबर! अर्थसंकल्पातील घोषणेनंतर सोने ४,२०० रुपयांनी स्वस्त

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मंगळवारी अर्थसंकल्पातून (Budget 2024) सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटीत कपात करण्याची घोषणा केली. सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी १५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांपर्यंत कमी केली आहे. तर प्लॅटिनमवरील कस्टम ड्युटीदेखील ६.४ टक्क्यांपर्यंत कमी केली आहे. अर्थसंकल्पातील या घोषणेनंतर सोने- चांदी दरात मोठी घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा दर ४,२०० रुपयांनी कमी झाला. तर चांदीच्या दरात ४,८०० रुपयांची घसरण झाली. (Gold Prices Today)

MCX ‍वर सोन्याचा दर आज प्रति १० ग्रॅम ७२,८३८ रुपयांवर खुला झाला होता. पण अर्थसंकल्पात (Union Budget 2024) सोन्यावरील कस्टम ड्युटीत कपात करण्याच्या घोषणेनंतर सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६८,५०० रुपयांपर्यंत खाली आला. यामुळे सोने आज प्रति १० ग्रॅममागे ४,२१८ रुपयांनी स्वस्त झाले. मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचा दर ७२,७१८ रुपयांवर बंद झाला होता.

सोन्यासह 'हे' होणार स्वस्त होणार

  • कर्करोगाशी संबंधित तीन औषधांवर कस्टम ड्युटी हटवली. एक्स-रे ट्यूब आणि फ्लॅट पॅनल डिटेक्टरवरील आयात शुल्कही हटवण्यात आले.

  • मोबाईल फोन आणि पार्ट्स- पीसीबी आणि मोबाईल फोन चार्जरवरील कस्टम ड्युटी १५ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे.

  • २५ अत्यावश्यक खनिजांवर सीमाशुल्क नाही.

  • सोलर सेल आणि सोलर पॅनेलच्या निर्मितीवर कर सवलत.

  • सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क ६ टक्के करण्यात आले. दागिने स्वस्त होतील.

  • प्लॅटिनमवरील सीमाशुल्क आता ६.४ टक्के करण्यात आले आहे.

  • मासे आणि इतर जलचरांच्या खाद्यपदार्थांवरील आयात शुल्क ५ टक्के करण्याचा निर्णय.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट (९९९) हे शुद्ध सोने समजण्यात येते. पण, दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असा उल्लेख केलेला असतो. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

SCROLL FOR NEXT