Urn stolen from Red Fort park : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात आयाेजित धार्मिक कार्यक्रमातून सुमारे एक कोटी रुपये किमतीचा किमतीचा हिरे, माणिक आणि पाचू जडवलेला रत्नजडित कलश चोरीस गेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चोरीला गेलेला हा कलश ७६० ग्रॅम सोन्याचा असून, त्यावर १५० ग्रॅम हिरे, माणिक आणि पन्ना जडवलेले आहेत. या प्रकरणी व्यापारी सुधीर जैन यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात ई-एफआयआर दाखल करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी एका संशयिताची ओळख पटवली असून, त्याला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
लाल किल्ल्याच्या १५ ऑगस्ट पार्क परिसरात २८ ऑगस्टपासून जैन धर्मियांचा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी एक विशेष व्यासपीठ तयार करण्यात आले होते. येथे परवानगी असणार्यांनाच बसण्याची व्यवस्था होती. या धार्मिळ सोहळ्यासाठी दररोज दिल्लीतील सुधीर जैन त्यांच्या घरातून हा मौल्यवान कलश पूजेसाठी आणत असत. मंगळवारी देखील ते कलश घेऊन कार्यक्रमात पोहोचले होते. त्यांनी कलश व्यासपीठावर ठेवला आणि आजूबाजूला भाविक बसले होते. लोकसभा अध्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजक आणि इतर लोक त्यांच्या स्वागतात व्यस्त झाले. नेमका याच गोंधळाचा फायदा घेत व्यासपीठावर असलेल्या लोकांचे लक्ष कलशावरून हटले. थोड्या वेळाने कलश पाहिला असता तो गायब झाल्याचे लक्षात आले.
या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तपासादरम्यान संशयित चोरटा मागील काही दिवसांपासून कार्यक्रम स्थळाभोवती फिरत असल्याचे समोर आले. कार्यक्रम स्थळी झालेल्या गर्दीचा फायदा घेत कलश घेवून तो पसार झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीचे हालचाली कैद झाल्या असून लवकरच अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुनीत जैन यांनी याआधी झालेल्या चोरीच्या घटना दाखवणारे जुने सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना दिले असून तपास सुरू आहे.