Gold and silver Price Dropped:
सोने आणि चांदीच्या दरात रेकॉर्ड ब्रेक वाढ झाल्यानंतर आता ते खाली येत असल्याचं दिसत आहे. नुवामा प्रोफेशनल क्लाईंट ग्रूपचे फॉरेक्स आणि कमोडिटी हेड अभिषेक कोईक्कारा यांनी हे दर घरण्यामागचं कारण हे करेक्शन आणि नफा मिळवण्यासाठी झालेली विक्री ही दोन प्रमुख कराणं सांगितली आहेत. त्यांनी आगामी काळात सोने चांदीच्या दरातील ही घसरण सुरू राहणार की पुन्हा दराचा बाण हा वरच्या दिशेनं जाणार याबाबत देखील अंदाज वर्तवला आहे.
MCX Gold ने सोने चांदीचे दर गगनाला भिडल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग केल्यामुळं सोने चांदीच्या दरात घसरण झालील. सोनं प्रती १० ग्रॅम १ लाख ३१ हजारापर्यंत पोहचल्यानंतर ते आता १ लाख २७ हजारापर्यंत खाली आलं आहे. यामुळं वाढणाऱ्या सोने चांदीच्या दराला खीळ बसली आहे. मात्र या प्रॉफिट बुकिंगमुळं किंमतींची मूळ सपोर्ट प्राईसचा स्तर (key support levels) देखील पार झाला आहे. त्यामुळं भविष्यात सोने चांदीचे दर अजून खाली येण्याची देखील शक्यता आहे.
जर प्रॉफिट बुकिंगच्या नावाखाली विक्रीचा ट्रेंड असाच सुरू राहिला तर सोन्याचा प्रती तोळा दर १ लाख २४ हजारपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. जर सोन्याचा दर याच्या खाली गेला तर सोने चांदीच्या दरात मोठी घसरण होण्याची देखील शक्यता आहे.
मात्र, सकारात्मक बाजू अशी आहे की १ लाख ३१ हजार या मागील उच्चांकावर (previous swing high) त्वरित प्रतिरोध (immediate resistance) दिसून येत आहे आणि या पातळीच्या वरची कोणतीही हालचाल या धातूमध्ये तेजीचा वेग (bullish momentum) पुन्हा स्थापित करू शकते.
मोठं चित्र पाहिलं तर जागतिक स्तरावर युएस डॉलर आणि बाँड हे नांगी टाकत आहेत. त्यात भूराजकीय परिस्थिती आणि त्याबाबतच्या घडामोडी पाहिल्या तर त्याचा थेट परिणाम हा सोने चांदीच्या दरावर होणार आहे.
फेडरल रिझर्व आपल्या व्याज दराबाबत काय भूमिका घेते यावरही गुंतवणूकदार लक्ष ठेवून आहेत. शॉर्ट टर्ममध्ये पाहिलं तर सोने चांदीच्या दरात करेक्शन येण्याची शक्यता आहे. मात्र लाँग टर्मचा विचार केला तर MCX Gold आशावादी असून दर अजून वाढतील असा अंदाज ते वर्तवत आहेत.