CCTV footage leaked to Pakistan pudhari
राष्ट्रीय

CCTV footage leaked to Pakistan: सावधान! तुमच्या CCTV कॅमेऱ्यातून पाकिस्तानात पोहोचतोय 'लाईव्ह' व्हिडिओ; नियमांत होणार मोठे बदल

Anirudha Sankpal

Ghaziabad spying racket news CCTV footage leaked to Pakistan: देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये पाकिस्तानशी संबंधित एका मोठ्या हेरगिरीच्या रॅकेटचा (Spying Racket) पर्दाफाश झाला आहे. या तपासात असे दिसून आले आहे की, अनेक संवेदनशील ठिकाणांवर लावलेल्या CCTV कॅमेऱ्यांचे 'लाईव्ह फुटेज' थेट सीमापार पाकिस्तानात पाठवले जात होते. या घटनेमुळे संपूर्ण देशातील CCTV नेटवर्कच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गृह मंत्रालयाकडून देशव्यापी ऑडिटचे आदेश

या गंभीर प्रकारानंतर केंद्र सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाने इंटेलिजन्स ब्युरो (IB) आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने देशभरातील CCTV नेटवर्कचे ऑडिट (सुरक्षा तपासणी) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी कार्यालये, विमानतळ आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांवरील कॅमेऱ्यांची सुरक्षा प्राधान्याने तपासली जाणार आहे.

चिनी कॅमेऱ्यांमुळे डेटा चोरीचा धोका

भारतात सध्या वापरल्या जाणाऱ्या CCTV कॅमेऱ्यांपैकी तब्बल ८०% कॅमेरे हे चीनमध्ये बनलेले आहेत. या कॅमेऱ्यांमधून डेटा चोरी होण्याचा आणि तो परकीय देशांतील सर्व्हरवर जाण्याचा मोठा धोका कायम असतो. गाझियाबादमधील घटनेने या भीतीला दुजोरा दिला असून, स्वस्त चिनी तंत्रज्ञान देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी किती घातक ठरू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

१ एप्रिलपासून फक्त 'हॅकिंगप्रूफ' कॅमेऱ्यांचीच विक्री

सुरक्षेतील या त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने कडक नियमावली जाहीर केली आहे. १ एप्रिलपासून बाजारपेठेत फक्त अशाच CCTV कॅमेऱ्यांची विक्री करता येईल जे:

हॅकिंगप्रूफ (Hacking Proof) असतील.

ज्यांना सरकारी सुरक्षा तपासणीचे (STQC Certification) प्रमाणपत्र मिळाले असेल.

सध्याच्या घडीला केवळ ७ कंपन्यांचे ५३ मॉडेल्स असे आहेत, ज्यांना सरकारने सुरक्षित मानले असून त्यांना आवश्यक प्रमाणपत्रे मिळाली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT