काँग्रेस नेते धर्मपुरी श्रीनिवास यांचे निधन  Facebook page
राष्ट्रीय

Dharmapuri Srinivas passed away | काँग्रेस नेते धर्मपुरी श्रीनिवास यांचे निधन

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

काँग्रेसचे संयुक्त आंध्र प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री धर्मपुरी श्रीनिवास यांचे आज शनिवारी पहाटे ३ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.

खासदार, मंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुले आहेत. त्यांचा दुसरा मुलगा धर्मपुरी अरविंद हा सध्या निजामाबादचा खासदार आहे. त्यांचा मोठा मुलगा संजय यांनी यापूर्वी निजामाबादचे महापौरपद भूषवले आहे.

श्रीनिवास यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त

तेलंगणाचे परिवहन आणि बीसी कल्याण मंत्री पोन्नम प्रभाकर यांनी श्रीनिवास यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत आणि या दुःखाच्या प्रसंगात देव त्यांच्या कुटुंबीयांना अधिक धैर्य देवो अशी त्यांनी प्रार्थना केली आहे.

तेलंगणाच्या पंचायत राज आणि ग्रामीण विकास, महिला आणि बालकल्याण मंत्री दानसारी अनसूया सिथाक्का यांनीही श्रीनिवास यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

SCROLL FOR NEXT