राष्ट्रीय

अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जून ते 3 जुलैपर्यंत

करण शिंदे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अठराव्या लोकसभेतील संसदेचे पहिले अधिवेशन 24 जून ते 3 जुलैदरम्यान होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या तीन दिवसांत नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली जाईल. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. 3 जुलै रोजी अधिवेशनाचे सूप वाजणार आहे. केंद्रीय सांसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी बुधवारी (दि.12) सोशल मीडियावरील 'एक्स'वर केलेल्या पोस्टमधून ही माहिती दिली आहे.

संसदेच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपतींचे अभिभाषण

लोकसभा आणि राज्यसभेच्या 27 जून रोजी होणाऱ्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण होणार आहे. राष्ट्रपती आपल्या अभिभाषणात पुढील पाच वर्षांतील सरकारच्या कामकाजाची रूपरेषा सादर करतील. त्यावर दोन्ही सभागृहात चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर अभिभाषणाला मंजुरी दिली जाणार आहे.

राज्यसभेत अभिभाषणावर वादळी चर्चा होणार

राज्यसभेचे कामकाज 27 जूनपासून सुरू होणार असून 3 जुलै रोजी समारोप होणार असल्याची माहिती सांसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जून रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर मंत्रिमंडळातील आपल्या सदस्यांचा परिचय करून देतील. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान विरोधी पक्षांकडून वादळी चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT