सिनेनिर्माता महेश कलावाडिया विमान अपघातानंतर बेपत्ता Pudhari
राष्ट्रीय

Ahmedabad plain crash: पत्नीला म्हणाला 'मी घरी येतोय', फोन सापडला ढिगाऱ्यापासून 700 मीटरवर; सिनेनिर्माता बेपत्ता

Ahmedabad plain crash victims: अजूनही महेश यांचा काहीच ट्रेस न लागल्याने त्यांच्या पत्नीने प्रशासनाला मदत करण्याची मागणी केली आहे

अमृता चौगुले

Ahemadabad Plain crash Update:

12 जून हा दिवस देशवासियांसाठी अत्यंत शोकपूर्ण ठरला. एअर इंडिया फ्लाइट AI-171  च्या भीषण अपघाताने प्रत्येकजण सुन्न झाला. या विमानाने टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही सेकंदांतच मानवी वस्तीत कोसळल्यानंतर एकच गोंधळ माजला. तब्बल 242 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या या विमानाचा प्रवाशांसाठी अखेरचा प्रवास ठरला. सर्वच्या सर्व प्रवासी, क्रू मेंबर आणि मेडिकल कॉलेजचे काही विद्यार्थी देखील या भीषण अपघातात मृत्युमुखी पडले.

या सगळ्यात सिनेनिर्माता महेश कलावाडिया देखील मृत्युमुखी पडले आहेत. म्युझिक अल्बम क्षेत्रात महेश यांचे नाव प्रसिद्ध होते. 12 जूनला दुपारी 1.14 वाजता त्यांनी पत्नी हेतलला फोन करून कळवले की त्यांची मीटिंग संपली असून ते परत येत आहेत. यानंतर त्यांचा फोन स्विच ऑफ झाला. त्यानंतर त्यांचा कोणताही थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर त्यांचा फोन घटनास्थळांपासून जवळपास 700 मीटर अंतरावर सापडल्याने खळबळ उडाली. अजूनही त्यांचा काहीच ट्रेस न लागल्याने त्यांच्या पत्नीने प्रशासनाला मदत करण्याची मागणी केली आहे.

महेश यांचे डीएनए सॅम्पल संबंधित विभागाला दिले आहेत. त्यांच्या बेपत्ता झाल्यापासून अजून काहीच प्रगती न झाल्याने कुटुंबीय काळजीत आहेत. सिनेसृष्टीसह परिचितांनी ते स्वस्थ असावेत यासाठी प्रार्थनाही सुरू केली आहे.

फ्लाइट AI – 171 ला आता सेवेतून रिटायर केले आहे. या दुर्घटनेत बळी पडलेल्या प्रत्येकाचा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भावनेचा आदर करत हे विमान सेवेतून हटवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. याशिवाय या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून या अपघाताचे नेमके कारण शोधण्यास मदत होईल असे सांगितले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT