Shocking Crime News pudhari
राष्ट्रीय

Shocking Crime News: कूकरने शिक्षक पत्नीचं डोकं फोडलं.. टबमध्ये बुडवलं त्यानंतर मृतदेहाजवळ ढसाढसा रडला; हे कसलं प्रेम?

Anirudha Sankpal

Shocking Crime News: एका पतीने आपल्या पत्नीला क्रूरपणे मारलं त्यानंतर त्यांने ही एक दुर्घटना असल्याच बनाव रचण्यासाठी मृतदेह रूग्णालयात नेला. मात्र पतीचा हा बनाव फार काळ टिकला नाही. त्याचे भांडाफोड झालंच. पती पत्नीवर संशय घेत होता. तिचं लव्ह अफेअर सुरू आहे असे त्याचे मत होते. मात्र मृत मुलीच्या वडिलांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

शालिनी होती शिक्षिका

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील नासिरपीर मोहल्ल्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे. तिथल्या एका भाड्याच्या घरात ८ ऑगस्ट रोजी सहाय्यक शिक्षक दिलीप कुमार यादवने आपल्या दोन भावांसोबत मिळून आपली पत्नी शालिनीची हत्या केली. आरोपीने पत्नीवर अनैतिक संबंधांचे आरोप ठेवले होते. त्याने पत्नीच्या डोक्यात कूकरच्या झाकणाने वार केला. त्यानंतर गळा पकडून अन्फ्लेटेबल टबमधील पाण्यात बुडवून हत्या केली.

मृत शालिनी एका खासगी शाळेत शिकवत होती. सध्या पोलिसांनी वैज्ञानिक तसेच फॉरेन्सिक तथ्यांच्या आधारवर दिलीप यादव याला खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. १२ ऑगस्ट रोजी त्याला न्यायालयात सादर करण्यात आले. त्याला न्यायालयिन कोठडी सुनावण्यात आली आहे.

खुनाला अपघात दाखवण्याचा प्रयत्न

एसपी अभिमन्यू मांगलिक यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, चक अल्लीपूरमध्ये सहाय्यक टीचर पदावर तैनात असलेला आरोपी दिलीप यादवने ८ ऑगस्टच्या सकाळी हे कृत्य केलं. त्याने कूकरने पत्नीवर हल्ला केला. त्यानंतर तिला टबमध्ये बुडवून मारलं. तो यानंतर २० मिनिटे बाहेर फिरत होता. तो परत आला आणि त्याने आपल्या भावांना फोन करून पत्नी एका दुर्घटनेत बेशुद्ध पडली आहे असं सांगितलं. त्यानंतर पत्नीला रूग्णालयात पाठवण्यात आलं. ९ ऑगस्ट रोजी कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला.

हे कसलं लव्ह मॅरेज?

मृत शालिनी शहरातील एका खासगी शाळेत खासगी शिक्षिका होती. दिलीप आणि शालिनी यांनी ३ डिसेंबर २०१७ मध्ये प्रेम विवाह केला होता. शादीपूर आणि नासिरपीर या भागात ते दोघे भाड्याच्या घरात रहात होते. याचवेळी या दोघांमधील वाद वाढू लागला. पोलीसांच्या तपासात पती पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय घेत होता. रागाच्या भरातच त्याने आपल्या पत्नीला मारल्याची कबुली त्यानं दिली आहे.

वडिलांनी आरोप फेटाळले

मृत शालिनीच्या वडिलांनी धर्मराज यादव यांनी पोलिसांच्या तपासाचे समर्थन केले. मात्र आपल्या मुलीवर विवाहबाह्य संबंध असल्याच्या आरोपांचे खंडन केलं. त्यांनी सांगितलं की एप्रिल २०२५ मध्ये दोघांमध्ये वाद सुरू होता. या वादाचे कारण दिलीपचे त्यांच्याच शाळेतील एका महिला शिक्षिकेसोबत अफेअर सुरू होतं असं सांगण्यात आलं. मुलीने ही गोष्ट घरात सांगितली होती. मात्र तरी देखील आरोपी दिलीप सुधरला नाही. त्याने उलट माझ्या मुलीवरच आरोप करायला सुरूवात केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT