Fatal accident in Patna, 6 people of the same family died, 5 injured
पाटण्यामध्ये भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू, ५ जखमी File Photo
राष्ट्रीय

Patna Road Accident : पाटण्यामध्ये भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू, ५ जखमी

निलेश पोतदार

पाटणा : पुढारी ऑनलाईन :

बिहारची राजधानी पाटणाच्या बख्तियारपूर परिसरात एक दुर्देवी घटना समोर आली आहे. येथील राष्‍ट्रीय महामार्गावर आज (मंगळवार) सकाळी रस्‍त्‍याच्या कडेला थांबलेल्‍या हायवा ट्रकला एका स्‍कॉर्पियो गाडीने जोराची धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्‍त होती की, स्‍कॉर्पिओ गाडीचा चक्‍काचूर झाला. या स्‍कॉर्पिओ कारमधे जवळपास ११ लोक प्रवास करत होते. यातील ६ लोकांचा मृत्‍यू झाला, तर ५ लोक जखमी झाले. या अपघातानंतर स्‍थानिक लोकांच्या मदतीने सर्व जखमींना रूग्‍णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी सर्वांवर उपचार सुरू आहेत. (Patna Road Accident)

मुंडण करायला निघालेले कुटुंबिय

या घटनेची माहिती अपघातग्रस्‍तांच्या कुटुंबियांना देण्यात आली. यानंतर जखमी लोकांचे कुटुंबिय घटनास्‍थळी दाखल झाले. मृतांच्या कुटुंबियांनी सांगितले की, बिहारच्या नवादा जिल्‍ह्यातून स्‍कॉर्पिओ गाडीतून पाटण्यातील बाढ उमानाथ मंदिरात मुंडण करण्यासाठी हे सर्वजण निघाले होते. या कुटुंबातील रामचंद्र राय म्‍हणाले की, या अपघातात ६ जणांचा मृत्‍यू झाला आहे. तर यातील जखमी ५ लोकांवर रूग्‍णालयात उपचार सुरू आहेत.(Patna Road Accident)

सर्व मृत एकाच कुटुंबातील

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रस्‍त्‍यावर थांबलेल्‍या ट्रकला स्‍कॉर्पियो कारने जोराची धडक दिली. या स्‍कॉर्पिओमध्ये एकाच कुटुंबातील ११ लोक बसले होते. हे सर्व लोक नवादा जिल्‍ह्यातून पाटण्याला जात होते. या अपघातात ४ लोकांचा घटनास्‍थळीच मृत्‍यू झाल्‍याचे त्‍यांनी सांगितले. तर बाकीच्या दोघांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. आतापर्यंत या अपघातात ६ लोकांचा मृत्‍यू झाला आहे.(Patna Road Accident)

SCROLL FOR NEXT