शेतकरी नेत्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची संसदेत भेट घेतली.  Pudhari News Network
राष्ट्रीय

Farmer leader Meet Rahul Gandhi | शेतकरी नेत्यांनी घेतली संसदेत राहुल गांधीची भेट

'एमएसपी'साठी सरकारवर दबाव आणण्याची मागणी

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शेतकरी नेत्यांच्या १२ सदस्यीय शिष्टमंडळाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची संसदेत भेट घेतली. या बैठकीत किमान आधारभूत किंमतीसाठी (एमएसपी) सरकारवर दबाव आणण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी विरोधी पक्षनेत्यांकडे केली. (Farmer leader Meet Rahul Gandhi)

किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चातील नेत्यांचा समावेश

या बैठकीनंतर बोलताना शेतकरी नेत्यांनी सांगितले की, संसदेत एमएसपीच्या मुद्द्यावरुन सरकारवर दबाव आणण्याची मागणी राहुल गांधी यांच्याकडे केली आहे. तसेच इंडिया आघाडीतील दुसऱ्या पक्षांकडेही ही मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शिष्टमंडळात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटकमधील किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चाच्या शेतकरी नेत्यांचा समावेश होता. (Farmer leader Meet Rahul Gandhi)

शेतकरी नेत्यांना संसदेत प्रवेश नाही

दरम्यान, बैठकी अगोदर शेतकरी नेत्यांना संसदेत प्रवेश करु दिला जात नसल्याचा आरोप राहुल गांधीनी केला. शेतकरी आहेत म्हणून त्यांना संसदेत येऊ देत नसल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. यानंतर शेतकरी नेत्यांना संसदेत प्रवेश मिळाला आणि राहुल गांधींच्या कार्यालयात बैठक झाली. (Farmer leader Meet Rahul Gandhi)

या बैठकीला काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल, काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश, अमरिंदर सिंह राजा वारिंग, सुखजिंदर सिंह रंधवा, गुरजित सिंह औजला, धरमवीर गांधी, डॉ. अमर सिंह, दीपेंद्र सिंह हुड्डा आणि जय प्रकाश यांच्यासह शेतकरी नेते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT