Crime News file photo
राष्ट्रीय

Crime News: ६ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची बादलीत डोके बुडवून हत्या

कौटुंबिक वादातून सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेची पतीने हत्या केल्याची घटना आज उघडकीस आली.

पुढारी वृत्तसेवा

फरिदाबाद: कौटुंबिक वादातून सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेची पतीने हत्या केल्याची घटना फरिदाबादमधील पंचशील कॉलनी भाग-२ मध्ये आज उघडकीस आली. नेहा कुमारी (वय २६) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ती मूळची बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील होती. याप्रकरणी तिचा पती अमित गुप्ता (रा. हरदोई, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पत्नीला मारहाण केली आणि त्यानंतर तिचे डोके पाण्याच्या बादलीत बुडवून तिची हत्या केली; त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी पल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.

नेहा आणि अमित यांचे लग्न गेल्या वर्षी ३० एप्रिल रोजी झाले होते. ते नुकतेच पंचशील कॉलनीतील घरात राहायला आले होते. महिन्याभरापूर्वीच त्यांनी गृहप्रवेशाचा कार्यक्रम केला होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी सकाळी दोघांमध्ये वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की रागाच्या भरात अमितने नेहाला बेदम मारहाण केली आणि नंतर तिचे डोके पाण्याच्या बादलीत बुडवून हत्या केली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक घरी पोहोचले तेव्हा त्यांना नेहा मृत अवस्थेत आढळली; त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. पल्ला पोलीस ठाण्याचे पथक, गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला.

तपासादरम्यान पोलिसांना समजले की, अमितने बदरपूर सीमेजवळील अलीपूर गावात राहणाऱ्या आपल्या काकांना फोन करून आपण पत्नीची हत्या केल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही वेळातच आरोपी घटनास्थळावरून पळून गेला आणि तेव्हापासून तो फरार आहे. त्याचा मोबाईल फोन बंद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT