आपचे नेते मनीष सिसोदिया आणि बीआरएसच्या के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत २५ जुलैपर्यंत वाढ  Pudhari News Network
राष्ट्रीय

Manish Sisodia : सिसोदिया, के. कवितांच्या न्यायालयीन कोठडीत २५ जुलैपर्यंत वाढ

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया आणि बीआरएसच्या के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत २५ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली. दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी राऊस अव्हेन्यू न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचा निर्णय घेतला.

दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी मनीष सिसोदिया आणि के. कविता तुरुंगात आहेत. त्यांची यापूर्वी सुनावण्यात आलेल्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपली. त्यामुळे दूरदृश्यप्रणालीद्वारे त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले. यावेळी राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी न्यायालयीन कोठडीत वाढ केली. त्यामुळे दोन्ही नेत्यांचा मुक्काम २५ जुलैपर्यंत तुरुंगात असेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT