Ethiopia volcano ash Delhi pudhari photo
राष्ट्रीय

Ethiopia volcano ash Delhi: इथियोपियामधील ज्वालामुखी स्फोटाची राख दिल्लीपर्यंत कशी पोहचली? जाणून घ्या १० महत्वाचे मुद्दे

इथियोपियामधील ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख घेऊन हे ढग भारताच्या पश्चिम उत्तर भागात पोहचले आहेत.

Anirudha Sankpal

Ethiopia volcano ash Delhi:

दिल्ली विमानतळावारील सर्व उड्डाणे आज प्रभावित झाली. अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. ही उड्डाणे दिल्लीतील स्मॉग किंवा प्रदुषणामुळे नाही तर इथियोपियातील ज्वालामुखी स्फोटामुळं रद्द करण्यात आली आहेत. तुम्ही म्हणाल की जवळपास ४ हजार किलोमीटरवर असलेल्या इथियोपियातील ज्वालामुखी स्फोटाचा दिल्लीवर कला परिणाम झालाय अन् त्यामुळं दिल्ली विमानतळावरील अनेक उड्डाणे कशी काय रद्द झाली.

तर इथियोपिया येथील हायली गुब्बी येथील ज्वालामुखी विस्फोट झाला आहे. त्याची राख भारताच्या पश्चिम उत्तर भारतापर्यंत पोहचली आहे. ही राख हाय अल्टीट्युडवरून वेगानं प्रवास करत गुजरातपर्यंत पोहचली. त्यानंतर ती राजस्थान, दिल्ली, हरियाणा आणि पंजाबपर्यंत पोहचली.

यानंतर विमातळावर सतर्कता बाळगत आहे. ज्वालामुखीची राख आणि ढग यांचा विमानांच्या इंजिनवर आणि एअर फिल्ड ऑपरेशनवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळं विमानतळ प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.

इंडिगो, एकासा एअर, केएलएम यांनी आपल्या उड्डाणाच्या वेळापत्रकात आधीच बदल केले आहेत. तर विमानतळ प्रशासन या राखयुक्त ढगांचा मार्ग कसा आहे याच्यावर लक्ष ठेवून आहेत.

इथियोपिया ज्वालामुखी स्फोटाची राख दिल्लीपर्यंत: १० महत्त्वाचे मुद्दे

DGCA चा सल्ला: इथियोपियातून वाहत आलेल्या ज्वालामुखीच्या राखेमुळे (Ash Plume) निर्माण होणाऱ्या संभाव्य अडथळ्यांसाठी तयार राहण्याकरिता DGCA (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) ने सोमवारी एअरलाईन्स आणि विमानतळांना सल्लागार जारी केला.

भारतातील प्रवेश: IndiaMetSky Weather नुसार, राखेचा ढग सोमवारी संध्याकाळी गुजरातमध्ये दाखल झाला आणि नंतर तो राजस्थान, वायव्य महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा आणि पंजाबच्या दिशेने सरकला.

राखेचा वेग आणि उंची: ही राखेची लाट १५,००० ते ४५,००० फूट उंचीवर १०० ते १२० किमी/तास वेगाने वाहत आहे.

राखेचे घटक: या राखेमध्ये फक्त राखच नाही, तर सल्फर डायऑक्साइड वायू, तसेच सूक्ष्म काच आणि खडकाचे कण (Microscopic Glass and Rock particles) यांचा समावेश आहे.

विमानसेवा रद्द: आकासा एअर (Akasa Air), इंडिगो (IndiGo) आणि केएलएम (KLM) या कंपन्यांनी विमानांचे उड्डाणे रद्द केली आहेत. विशेषतः मध्य पूर्व (Middle East) आणि युरोप मार्गांवर परिणाम झाला आहे.

आकासा एअरची विमाने रद्द: ज्वालामुखीच्या राखेमुळे आकासा एअरने जेद्दाह, कुवैत आणि अबू धाबी साठीची २४ आणि २५ नोव्हेंबर २०२५ ची उड्डाणे रद्द केली.

एअरलाईन्सला सूचना: DGCA ने एअरलाईन्सना राख प्रभावित हवाई क्षेत्र टाळण्यास, उड्डाण योजनांमध्ये बदल करण्यास आणि इंजिनमधील बिघाड किंवा केबिनमध्ये धूर/वास आल्यास तातडीने तक्रार करण्यास सांगितले आहे.

विमानतळांना निर्देश: विमानतळांना धावपट्टी (Runways), टॅक्सीवे आणि ऍप्रनची तपासणी करण्याचे आणि राखेचे प्रदूषण आढळल्यास साफसफाई पूर्ण होईपर्यंत कामकाज थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई विमानतळाचा इशारा: मुंबई विमानतळाने प्रवाशांना सतर्क केले की, इथियोपियातील ज्वालामुखीमुळे पश्चिम आशियातील हवाई क्षेत्रावर परिणाम झाला आहे, ज्यामुळे काही आंतरराष्ट्रीय मार्गांवर परिणाम होऊ शकतो.

ऐतिहासिक स्फोट: जवळजवळ १०,००० वर्षे शांत असलेल्या या ज्वालामुखीचा स्फोट रविवारी सकाळी (भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता) झाला, ज्यामुळे ही राख इतक्या दूरपर्यंत पोहोचली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT