Ethanol-petrol Pudhari Photo
राष्ट्रीय

Ethanol-petrol : इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा फटका! जुन्या वाहनांचं इंजिन कमजोर, मायलेजमध्ये मोठी घट : सर्वेक्षण

सर्वेक्षणातून धक्कादायक निष्कर्ष : इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे जुन्या वाहनांची कार्यक्षमता कमी

पुढारी वृत्तसेवा

ethanol mixed petrol is affecting mileage of old vehicles claims survey

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशात पेट्रोलमध्ये एथेनॉल मिसळून विक्री केली जात आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या आयातीत घट होईल आणि सरकारी तिजोरीची बचत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल. मात्र, यामुळे वाहनांच्या मायलेजवर परिणाम होत असल्याचा मुद्दाही समोर येत आहे.

भारतात इथेनॉल मिश्रित पेट्रोल (E20) वापरल्याने जुन्या वाहनांच्या स्थितीवर वाईट परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. LocalCircles च्या ताज्या सर्वेक्षणानुसार, 2022 किंवा त्यापूर्वीच्या पेट्रोल वाहनांचे केवळ मायलेज कमी झालेले नाही, तर त्यांच्या इंजिनमध्येही बिघाड होत आहे. ही बाब लक्षात घेऊन सरकारने यावर्षी 1 एप्रिलपासून पेट्रोलची गुणवत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारने आदेश दिला आहे की, 1 एप्रिलपासून विक्री होणाऱ्या पेट्रोलचा ‘रिसर्च ऑक्टेन नंबर’ (RON) किमान 95 असावा. जास्त ऑक्टेन असलेले इंधन इंजिनसाठी अधिक सुरक्षित मानले जाते. त्यामुळे इंजिनमध्ये ‘नॉकिंग’ (खट-खट असा आवाज) होण्याचा धोका कमी होतो.

इंजिनमध्ये इंधन नीट न जळल्यास नॉकिंग होते, ज्यामुळे दीर्घकाळात इंजिनला मोठे नुकसान होऊ शकते. मात्र, नव्या ऑक्टेन नियमामुळे जुन्या वाहनांमधील या समस्या पूर्णपणे सुटतील की नाही, हे पाहावे लागेल.

तज्ज्ञांच्या मते, E20 साठी खास तरतूद केलेल्या वाहनांमध्ये (2023 पूर्वीच्या बहुतांश वाहनांमध्ये हे बदल नसतात) E20 पेट्रोल वापरल्यास इंजिनमध्ये गंज लागू शकतो. रबर आणि प्लास्टिकचे पार्ट खराब होऊ शकतात तसेच मायलेजही कमी होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये तर इंजिन फेल होण्याचा धोका देखील व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT