Jammu kashmir Espionage Case News
श्रीनगर : जम्मूमध्ये लष्करातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीविरोधात हेरगिरीच्या आरोपांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेने चॅटजीपीटी आणि क्लॉड यांसारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) टूल्सच्या मदतीने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील विषयांवर संशोधनपर नोट्स तयार केल्याचा आरोप आहे.
हे दस्तावेज चीनी गुप्तचर यंत्रणांशी संबंधित व्यक्तींसाठी तयार करण्यात आले होते का, याचा तपास यंत्रणा करत आहेत. तेलंगणातील रहिवासी ही महिला फ्रीलान्स संशोधक होती. तिने आंतरराष्ट्रीय संबंध आणि जागतिक प्रशासन या विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, संयुक्त राष्ट्रांही इंटर्नशिप केली होती.
पोलिसांनी सध्या या प्रकरणातील जप्त साहित्य, विदेशी संपर्काची ओळख व शोध मोहिमेबद्दलची माहिती उघड केलेली नाही. महिलेची विदेशी संपर्काशी कशी ओळख झाली, संभाषण कधी सुरू झाले आणि कोणत्या पातळीपर्यंत माहितीची देवाणघेवाण झाली, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत.
ही महिला बौद्धिक जाळ्याची शिकार ठरल्याची शक्यता आहे. म्हणजे ज्यांना ती शैक्षणिक किंवा संशोधन जगतातील समझायची, ते प्रत्यक्षात कथितरीत्या संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणारे गुप्तहेर होते. तथापि, सामायिक केली गेलेली कागदपत्रे, माहिती आणि सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.