ED QR code Summons Pudhari Photo
राष्ट्रीय

ED QR code Summons : आता ED च्या नोटीसवर असणार QR code... हाऊस अरेस्टच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी उचललं मोठं पाऊल

सक्तवसूली संचलनालयानं आपल्या अधिकाऱ्यांना ईडीची सिस्टम जनरेटेड नोटीस ही अत्यंत अपरिहार्य परिस्थितीत द्यावी असे निर्देश दिले आहेत.

Anirudha Sankpal

ED QR code Summons :

सक्तवसूली संचलनालयानं अर्थात ईडीनं दिल्या जाणाऱ्या सिस्टम जनरेटेड नोटीसवर आता क्यू आर कोड असणार आहे असं सांगितलं आहे. हा निर्णय कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी घेण्यात आला आहे. गेल्या काही काळात देशभरात असे तोतय्या ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट झाला होता. त्यांनी अनेक लोकांना करोडो रूपयांचा गंडा घातला होता. हाऊस अरेस्टचे प्रमाण देखील प्रचंड वाढले होते. त्यानंतर खुद्द पंतप्रधान आणि गृह मंत्र्यांना याबाबत आवाहन करावं लागलं होतं.

सक्तवसूली संचलनालयानं आपल्या अधिकाऱ्यांना ईडीची सिस्टम जनरेटेड नोटीस ही अत्यंत अपरिहार्य परिस्थितीत द्यावी असे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर ही सिस्टम जनरेटेड नोटीस ही व्यवस्थित सही शिक्क्यासह असली पाहिजे, त्यावर संपर्कासाठी त्या अधिकाऱ्याचा इमेल आयडी आणि फोन नंबर देखील असला पाहिजे असे आदेश देण्यात आले आहेत.

पीएमएलए अॅक्ट अंतर्गत देण्यात येणाऱ्या तसंच फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट अंतर्गत देण्यात येणाऱ्या ईडीच्या नोटीसवर आता QR code असणार आहे. याबाबतचे प्रसिद्धी पत्रक ईडीनं प्रसिद्ध केलं आहे. यात 'ज्याला ईडीची नोटीस आली आहे तो ही नोटीस खरी आहे की खोटी याची पडताळणी त्या नोटीसवर असणारा QR code स्कॅन करून करू शकतात. ज्यावेळी हा QR code स्कॅन करण्यात येईल त्यावेळी तो संबधित व्यक्तीला ईडीच्या पोर्टलवर घेऊन जाईल. तिथं नोटीसमधील डिटेल पाहता येतील. यासाठी देखील नोटीसवरील पासवर्डचा वापर करून हे डिटेल पाहता येतील.'

इडीनं नुकतेच खोट्या ईडीच्या नोटीस देऊन लोकांना लुबाडणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त केलं होतं. ही टोळी लोकांना आणि उद्योगपतींना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळत होती. असा प्रकराची खोटी नोटीस निप्पॉन पेंट्सच्या संचालकांना देखील आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT