राष्ट्रीय

एलॉन मस्क यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन; म्हणाले, ‘आता माझ्या कंपन्या भारतात…’

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जूनला संध्याकाळी ६ वाजता तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल स्पेसएक्स आणि टेस्ला कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क (Elon Musk) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. मस्क यांनी 'एक्स' पोस्टमध्ये मोदींना शुभेच्छा देत त्यांच्या कंपन्या भारतात काम करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहीले आहे की, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही निवडणुकीतील तुमच्या विजयाबद्दल नरेंद्र मोदींचे अभिनंदन! माझ्या कंपन्या भारतात काम करणाऱ्याची वाट पाहत आहेत, असे म्हटले आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये मस्क यांनी अमेरिकेत पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. यावेळी मस्क यांनी स्वत:ला मोदींचा चाहता म्हणवून घेत टेस्ला भारतात गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले होते.

सरकार स्थापनेचे मोदींना निमंत्रण

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळाले आहे. एनडीएच्या संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी सलग तिसऱ्यांदा फेरनिवड झाली. एनडीएच्या सर्वच नवनिर्वाचित खासदारांनी एकमुखाने त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. नेतेपदी निवड होताच नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा केला. सायंकाळी राष्ट्रपतींनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT