Electric Car file photo
राष्ट्रीय

Electric Car: इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती होणार अर्ध्या! भारतात सुरू होतोय मोठा प्रकल्प

इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती लवकरच लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात. भारतात सुरू होतोय जगातील सर्वात मोठा प्रकल्प.

मोहन कारंडे

Electric Car

मुंबई: इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती लवकरच लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात. 'हिमाद्री स्पेशॅलिटी केमिकल्स' ही भारतीय कंपनी बॅटरीसाठी लागणारे अत्यंत महत्त्वाचे 'लिथियम आयर्न फॉस्फेट' (LFP) कॅथोड मटेरियल भारतातच तयार करणार असून, यामुळे ईव्ही क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे. यासाठी कंपनी जगभरातील ईव्ही आणि बॅटरी उत्पादकांशी चर्चा करत आहे.

काय आहे कंपनीची मोठी योजना?

हिमाद्री स्पेशॅलिटी केमिकल्सने ओडिशामध्ये दरवर्षी २ लाख मेट्रिक टन उत्पादन क्षमता असलेला प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. सुमारे १,१२५ कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्लांटचे विशेष महत्त्व म्हणजे, चीनबाहेर अशा प्रकारचे साहित्य तयार करणारा हा जगातील पहिलाच मोठा प्रकल्प ठरणार आहे. येत्या ५ वर्षांत १०० गीगावॉट-अवर (GWh) क्षमतेच्या बॅटरीसाठी लागणारे साहित्य पुरवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२७ च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.

LFP बॅटरीमुळे किंमत कशी कमी होणार?

सध्या जगभरातील ईव्ही कंपन्या लिथियम-आयन फॉस्फेट बॅटरीकडे वळत आहेत. याची मुख्य कारणे म्हणजे, या बॅटरी जुन्या बॅटरीच्या तुलनेत स्वस्त आणि जास्त काळ टिकणाऱ्या आहेत. काही अहवालांनुसार, यामुळे बॅटरीची किंमत निम्मी होऊ शकते. LFP बॅटरी आग लागण्याचा धोका आणि अति उष्णता चांगल्या प्रकारे सहन करू शकतात, त्यामुळे त्या अधिक सुरक्षित मानल्या जातात. या बॅटरीचे आयुष्य जास्त असून त्या साधारणपणे १० वर्षांपर्यंत चालू शकतात. यात कोबाल्ट किंवा निकेलचा वापर होत नाही, त्यामुळे त्या पर्यावरणासाठी चांगल्या आहेत.

काय करते ही कंपनी?

हिमाद्री स्पेशॅलिटी केमिकल्स ही भारतातील 'कोल टार डेरिव्हेटिव्ह्ज' आणि 'स्पेशॅलिटी कार्बन ब्लॅक' बनवणारी सर्वात मोठी कंपनी आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल १,१३३ कोटी रुपये होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT