राष्ट्रीय

Election Result 2024 : अभिनेता पवन कल्याणची राजकारणात दमदार एन्ट्री, ‘जेएसपी’ने जिंकल्या २१ जागा

सोनाली जाधव
पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य अभिनेता-राजकारणी पवन कल्याण यांच्या जनता सेना पक्षाने आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेच्या २१ जागा जिंकल्या आहेत. जनता सेना पक्ष (JSP) ची तेलगू देसम पार्टी आणि भारतीय जनता पक्षासोबत युती  निवडणूक लढवली होती.
जनता सेवा पक्षाचा प्रमुख आणि दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काकीनाडा जिल्ह्यातील पिथापुरम मतदारसंघातून 1,34,394 मतांनी  विजय मिळवला आहे. त्यांनी व्हीएसआरसीपीचे उमेदवार वंगा गीता विश्वनाथ यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. पिठापुरम हा कापू समाजाचे वर्चस्‍व असलेला मतदारसंघ म्‍हणून ओळखला जाताे. पवन कल्याण आणि वंगा गीता हे दोघेही त्याच समुदायाचे आहेत. पवन कल्याण यांच्या जनता सेवा पक्षाने सर्व २१ जागा जिंकल्या आहेत. Election Result 2024

चित्रपट ते राजकारण

जेएसपी प्रमुख पवन कल्याण यांनी १९९६ मध्ये तेलुगू चित्रपट अक्काडा अम्माई इक्काडा अब्बाईमधुन आपल्या करिअरची सुरुवात केली. २००३ मध्ये त्‍यांनी जॉनी या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून डेब्यू केला होता. २०१४ मध्ये पवन कल्याण यांनी राजकारणात प्रवेश केला. पवन हे दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांचे  धाकटा बंधू तर दाक्षिणात्य अभिनेता रामचरण याचे काका आहेत. १३ मे रोजी आंध्र प्रदेशात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एकाचवेळी मतदान झाले. राज्यातील १७५ विधानसभा मतदारसंघापैकी तेलगु देसम पार्टीने १४४ जागांवर, जनता सेना पक्षाने २१ जागांवर आणि भाजपने १० जागांवर निवडणूक लढवली हाेती
. सुपरस्टार चिरंजीवीने  पवनचे केले अभिनंदन
चिरंजीवीने आपला धाकटा भाऊ पवन कल्याण याचे विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. चिरंजीवीने आपल्या 'X' अकाउंटवर ट्वीट केले आहे की, 'माझ्या प्रिय कल्याण बाबू, आंध्र प्रदेशच्या जनतेने दिलेल्या प्रचंड आणि अद्भुत जनादेशाने मी रोमांचित आहे. तू खरोखरच या निवडणुकीचा गेम चेंजर झाला आहेस. तू मॅन ऑफ द मॅच आहेस. आंध्र प्रदेशातील लोकांबद्दलची तुझ्या मनातील चिंता, दूरदृष्टी, राज्याच्या विकासासाठी इच्छा, त्याग, राजकीय रणनीती या शानदार निकालातून दिसून येते. मला तुझा अभिमान आहे. खूप खूप अभिनंदन."
हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT