Trinamool Symbol disput 
राष्ट्रीय

TMC symbol dispute : निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसचे चिन्ह तात्‍पुरते गोठवले! शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षासारखाच TMC चा निर्णय

महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सत्तासंघर्षानंतर, तृणमूल काँग्रेस’ पक्षातही तशाच पद्धतीची उलथापालथ, ममता बॅनर्जी व अरुप रॉय दोघानांही धक्का

Namdev Gharal

TMC symbol dispute महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सत्तासंघर्षानंतर आता पश्चिम बंगालमधील सत्ताधारी ‘ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ (TMC) पक्षातही तशीच राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. पक्षांतर्गत बंड आणि दोन गटांतील तीव्र वाद लक्षात घेता केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत तृणमूल काँग्रेस पक्षाचे नाव आणि मूळ निवडणूक चिन्ह (जोडफूल) तात्पुरते गोठवले आहे. पक्ष नेतृत्वावरून निर्माण झालेल्या या वादामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बंडखोर नेते अरूप रॉय या दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. चिन्हासाठीच्या लढाईत पोटनिवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाची स्थगितीची कारवाई केली आहे.

6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या नंदीग्राम आणि रेजीनगर पोटनिवडणुकीत दोन गटांपैकी एकाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दुसरे ऋतब्रता बॅनर्जी, AITC आणि 'फुले आणि गवत' वापरू शकत नाहीत.असे आयोगाने म्हटले आहे.

तृणमूल काँग्रेसचे (TMC) नाव आणि निवडणूक चिन्हावरून ममता बॅनर्जी आणि रितब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटांमध्ये संघर्ष सुरू आहे. या वादाबाबत आज (दि. १७ सप्‍टेंबर) निवडणूक आयोगासमोर महत्त्वाची सुनावणी झाली. गुरुवारी दिल्लीत दोन्ही गट आयोगासमोर आपापले युक्तिवाद स्वतंत्रपणे माडले. यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला.

निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे निर्देश :

मूळ नावावर बंदी : ममता बॅनर्जी गट आणि अरूप रॉय गट या दोघांपैकी कोणालाही ‘ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे मूळ नाव स्वतंत्रपणे वापरता येणार नाही.

नावासाठी मुदत : दोन्ही गटांना स्वतंत्र ओळख निश्चित करण्यासाठी १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत पक्षाच्या नव्या नावाचे प्रत्येकी तीन पसंतीचे पर्याय निवडणूक आयोगाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय तात्पुरत्या स्वरूपाचा (Interim Order) आहे. पक्षाची खरी मालकी कोणाकडे, याचा अंतिम निर्णय ‘निवडणूक चिन्ह आदेश, १९६८’ च्या पॅरा १५ अंतर्गत दोन्ही बाजूंची कागदपत्रे आणि बहुमत तपासूनच घेतला जाईल.

महाराष्ट्रात ज्याप्रमाणे शिवसेना (शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट) यांच्यात पक्षाचे नाव आणि चिन्हावरून संघर्ष पेटला होता, अगदी तशीच परिस्थिती आता पश्चिम बंगालच्या राजकारणात निर्माण झाली आहे. दोन्ही गट आता आयोगासमोर कोणते नाव आणि चिन्ह सादर करतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT