दिल्लीतील पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि भाजपचे नेते सुकांत मुजुमदार यांच्या उपस्थितीत टेनिसपटू लिएंडर पेस यांचा भाजपमध्ये प्रवेश केला.  
राष्ट्रीय

Leander Paes Joins BJP | एकेकाळी तृणमूलमध्ये असलेले टेनिसपटू लिअँडर पेस निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये दाखल

Leander Paes Joins BJP | पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडी वेगावल्‍या

पुढारी वृत्तसेवा

Leander Paes Joins BJP

कोलकाता : पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोडी घडली आहे. भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस यांनी आज (दि. ३१) अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पाच राज्‍यांमध्‍ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पेस यांचा हा प्रवेश भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्‍यान, ऑक्टोबर २०२१ मध्ये, पेस यांनी गोव्यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून तृणमूल काँग्रेसमध्‍ये प्रवेश केला होता. पश्चिम बंगालमध्ये मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर त्‍यांनी गोव्यामध्ये निवडणुका लढवण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसने घेतला होता.

पेस यांनी भारताला ऑलिम्पिक नकाशावर स्थान मिळवून दिले : रिजिजू

दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि भाजपचे नेते सुकांत मुजुमदार यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व देण्यात आले. पेस यांचे पक्षात स्वागत करताना केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी १९९६ च्या अटलांटा (बार्सिलोना ऐवजी) ऑलिम्पिकमधील त्यांच्या कामगिरीच्या आठवणींना उजाळा दिला.ते म्हणाले, "त्या काळात पदकांच्या तालिकेत भारताचे नाव क्वचितच दिसायचे. लिएंडर पेस यांनीच पहिल्यांदा भारताला ऑलिम्पिक नकाशावर स्थान मिळवून दिले. आता ते भाजपच्या माध्यमातून देशाची सेवा करतील."

मला देश आणि तरुणांची सेवा करायची आहे : पेस

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माध्‍यमांशी बोलताना पेस म्‍हणाले, "आयुष्यातील ४० वर्षे मी देशासाठी खेळलो. डेव्हिस कप आणि ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि देशासाठी आदर मिळवला. आता हे एक नवीन क्षेत्र आहे. माझ्या बांधवांनी माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली असून, मला देश आणि तरुणांची सेवा करायची आहे."यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे आभार मानले.

लिएंडर पेस यांची टेनिस कारकीर्द

  • पुरुष दुहेरीतील माजी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी राहिलेल्या पेस यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण १८ ग्रँड स्लॅम पदके जिंकली आहेत. यामध्ये विम्बल्डनच्या ५ जेतेपदांचा समावेश आहे.

  • १९९९ मध्ये महेश भूपतीसोबत जोडी जमवत त्यांनी पहिले विम्बल्डन जेतेपद पटकावले होते. ही जोडी भारतीय टेनिस इतिहासातील सर्वात यशस्वी जोडी मानली जाते.

  • १९९६ च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी पुरुष एकेरीत कांस्य पदक जिंकून इतिहास रचला होता. उपांत्य फेरीत मनगटाला दुखापत झालेली असतानाही त्यांनी आंद्रे आगासीविरुद्ध कडवी झुंज दिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT