Durgapur Gang Rape Case Mamata Banerjee Girls shouldn't go out late at night comment :
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 'वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी रात्री उशिरा बाहेर पडणे टाळावे,' या आशयाचे विधान केल्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. दुर्गापूर येथील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार घटनेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केले.
मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या की, "वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाचे नियम पाळावेत आणि रात्री उशिरा बाहेर जाऊ नये. विद्यार्थिनींना हवे तिथे जाण्याचा मूलभूत अधिकार असला तरी, त्यांनी उशिरा बाहेर पडणे टाळावे." त्यांनी पुढे स्पष्टीकरण दिले की, "रात्री कोण घराबाहेर पडत आहे हे पोलीस अधिकाऱ्यांना माहीत नसते आणि ते प्रत्येक घराचे रक्षण करू शकत नाहीत."
मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर भाजप, काँग्रेस आणि माकपच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. महिलांच्या सुरक्षेऐवजी त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घालण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे म्हणत विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांचे विधान असंवेदनशील असल्याचे म्हटले आहे. या विधानामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांची नवी मालिका सुरू झाली आहे.
दरम्यान, पीडित मुलीच्या वडील देखील ममता बॅनर्जी यांच्यावर भडकले. ममता बॅनर्जी यांनी पीडित मुलगी रात्री साडेबारानंतर वसतीगृहाच्या बाहेर का होती असा प्रश्न विचारला. यावर संतप्त झालेल्या पीडिताच्या वडिलांनी माध्यमांशी बोलाना सांगितलं की, 'ही घटना रात्री ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास झाली आहे.
पीडित मुलीच्या वडिलांनी माझी मुलगी रात्री आठ वाजता बाहेर गेली होती असं सांगितलं. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या नॅरेटीव्हला आव्हान दिलं आङे. त्यामुळं आता राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. पीडित मुलगी ही ओडिसाची रहिवासी असल्यानं ओडिसाच्या मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.